Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • बुद्धगया महाविहार देशव्यापी आंदोलानंतर्गत;राजूर दीक्षाभूमी बुद्धविहारचे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन..
  • वणी

बुद्धगया महाविहार देशव्यापी आंदोलानंतर्गत;राजूर दीक्षाभूमी बुद्धविहारचे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन..

NewWaniDiary 10/03/2025

वणी : बिहार येथील बुद्धगयातील महाबोधी महाविहार हे जगातील बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ असून गेल्या कित्येक शतकांपासून हे महाबोधी महाविहार यांचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपविण्यात यावे यासाठी संघर्ष सुरू आहे. परंतु याकडे भारतातील सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही करिता सध्या ह्या प्रश्नावर संपूर्ण देशव्यापी संघर्ष मोहीम सुरू असून त्या अंतर्गत राजूर कॉलरी येथील दीक्षाभूमी बुद्धविहार व बौद्ध बांधवांचे वतीने महामहीम राष्ट्रपती यांना दि. 10 मार्च रोजी, वणी येथील उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत देण्यात आले.

बिहार येथील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगातील बौद्धांसाठी पवित्र श्रद्धा स्थान असलेले प्राचीन विहार आहे. त्या ठिकाणी अडीज हजार वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली होती. ब्रिटिशांचे काळात बौद्ध विचारवंत अनागरिक धम्मपाल ( श्रीलंका) यांनी पुनर्जीवित केले होते. गेल्या दोन अडीचशे वर्षांपासून ह्या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध धर्मियांचे हाती येऊ शकले नाही. त्यासाठी बौद्ध धर्मियांकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध बांधवांकडे सोपविण्यात यावे आणि सन 1949 च्या बुद्धगया मंदिर कायदा रद्द करून बुद्ध गया महाबोधी महाविहार चे व्यवस्थापन गैरबौद्धांपासून मुक्त करावे अशी मागणी ह्या देशव्यापी आंदोलनंतर्गत करीत असताना राजूर येथील बौद्ध बांधवांकडून निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

निवेदन देते वेळेस दीक्षाभूमी बुद्धविहार कमिटी चे सचिव ॲड. जितकुमार चालखुरे, उपाध्यक्ष पंकज कांबळे,माजी पं. स. सदस्य अशोक वानखेडे, ॲड. कुमार मोहरमपुरी, यशवंत पाटील, सोमेश्वर जांगडे व अनेक बौद्धबांधव मोट्या संखेने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: विरोधकांकडून संसदेत मतदार यादीवरील सविस्तर चर्चेची मागणी..
Next: वणी शहरात शांतता राखण्याचे आवाहन..

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.