Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी शहर
  • दामले फैलतील; टुपवेल बोर खूप दिवसांपासून बंद असल्याने स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना..
  • वणी शहर

दामले फैलतील; टुपवेल बोर खूप दिवसांपासून बंद असल्याने स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना..

NewWaniDiary 29/03/2025

वणी : शहरातील दामले फैलतील नगरपालिका शौचालयासमोर असलेली पाण्याची इलेक्ट्रिक टुपवेल बोर खूप दिवसांपासून बंद असल्याने स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. तापमान वाढल्यामुळे या समस्येने गंभीर रूप घेतले आहे,ही बोर नगर पालिकाचे असून यामुळे नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी कमी असल्यामुळे, स्थानिक गरीब नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते, जे त्यांच्या आर्थिक आणि शारीरिक परिस्थितीला अधिक अवघड बनवते. याशिवाय, अन्य नगरपालिकेतील समस्याही गंभीर होण्याच्या मार्गावर आहेत.

पाणी पुरवठा विभाग, नगर परिषद वणी, आणि संबंधित अधिकारी यांना विनंती केली जाते की, कृपया या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन बंद असलेली बोर त्वरित दुरुस्त केली जावी. तसेच, या समस्येवर उपयुक्त उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा द्यावा. स्थानिक नागरिकांच्या वतीने ही मागणी करण्यात आलेली आहे.

Continue Reading

Previous: चंद्रपूर येथे;खाजगी डॉक्टर कडील टीबी निक्षय मित्राचा गौरव सोहळा संपन्र!
Next: श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन मोट्या उत्साहात साजरी..

Related Stories

SAVE_20250722_212938
  • वणी शहर

वणी शहरातील दलित वस्तीतील सार्वजनिक शौचालय दयनीय अवस्थेत; आरोग्याचा गंभीर प्रश्न

NewWaniDiary 22/07/2025
IMG_20250321_172856_1-1024x768.jpg
  • वणी शहर

वणी शहरातील;निर्गुडा नदीची स्थिती अत्यंत दयनीय अवस्था..

NewWaniDiary 21/03/2025
SAVE_20250313_202957_11zon
  • वणी शहर

मा. सुरेश रायपुरे, माजी वणी नगराध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

NewWaniDiary 13/03/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.