Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • राजुर
  • महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे वतीने डॉ. आंबेडकर अभ्यासिकेला ग्रामपंचायत तर्फे पुस्तके भेट!
  • राजुर

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे वतीने डॉ. आंबेडकर अभ्यासिकेला ग्रामपंचायत तर्फे पुस्तके भेट!

NewWaniDiary 01/05/2025

▪️स्पर्धा परीक्षा यशात अभ्यासिका केंद्राचे योगदान..

राजुर कॉलरी : जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त येथील ग्रामपंचायत मध्ये  सरपंच विद्याताई डेव्हिड पेरकावार यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजारोहण करण्यात आले तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राला ग्रामपंचायत तर्फे पुस्तके भेट देण्यात आली.
राजुर ग्रामपंचायत द्वारे चालविल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रात येथील विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येऊन अभ्यास करून यश मिळवित आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन आणि त्यांना लागणारी लेटेस्ट पुस्तके ग्रामपंचायत द्वारे उपलब्ध करून देण्यात आले.

या दोन्ही प्रसंगी प्रामुख्याने  अशोक वानखेडे, अशोक भगत, प्रणिताताई मो. असलम, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा. पं. सदस्य,पायलताई अनिल डवरे ग्रा. पं. सदस्य, कु. चेतनाताई यशवंत पाटील ग्रा. पं. सदस्य, बबिताताई रामेश्वर सिंह, ग्रा. पं. सदस्य, डॉ. तेजस आस्वले, वैद्यकीय अधिकारी. प्रा. आ. केंद्र राजूर, डेव्हिड पेरकावार, कुमार मोहरमपुरी, अनिल डवरे,  रामलु बोलगमवार, यशवंत पाटील, गोवर्धन दुर्योधन, पुरुषोत्तम फुलेझेले, सचिव ग्रा. पं. राजूर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे विद्यार्थी व गावातील ग्रामस्त उपस्थित होते.

Continue Reading

Previous: वणी येथे: महाराष्ट्र दिनाचा निषेध!आंदोलन समितीने काळा दिवस पाळला..
Next: महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त राजूर येथे प्रबोधन कार्यशाळा..

Related Stories

SAVE_20250928_191620
  • राजुर

राजुर कॉलरी येथे भगतसिंग जयंती साजरी

NewWaniDiary 28/09/2025
SAVE_20250518_133643
  • राजुर

कुणी सांगितले म्हणून नाही तर स्वतः प्रेरित व्हा – प्रा. वैभव ठाकरे

NewWaniDiary 18/05/2025
SAVE_20250504_175554
  • राजुर
  • चळवळ

डॉ. बाबासाहेबांनी चिन्हीत केलेल्या शत्रूकडे दुर्लक्ष केल्यानेच आजची दैन्यावस्था – अरुण भेलके

NewWaniDiary 04/05/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.