Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी
  • स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीच प्रजासत्ताक?
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी

स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीच प्रजासत्ताक?

NewWaniDiary 25/01/2025


-अंकुश शिंगाडे नागपूर


स्वातंत्र्य घेता का हो स्वातंत्र्य. असं जर कोणी आपल्याला दिसलं तर आपण म्हणू की संबंधीत व्यक्तीला वेड तर लागलं नाही ना. तसं पाहिल्यास आज हेच म्हणण्याची वेळ आली आहे.
स्वातंत्र्य म्हणजे मुक्त जगणं. मनात येईल तसं जगणं. एवढा सोपा अर्थ आहे.

आज हेच स्वातंत्र्य हिरावत चाललेले दिसत आहे. कारण आज माणसाच्या मनात चांगले विचार उरलेलेच नाही. सर्व कुविचार भरलेले आहेत. तरीही कालानुकाल काही थोर महात्म्ये जन्म घेतात व माणसाच्या मनातील कुविचारांचं शुद्धीकरण करतात. जसा रक्तात आलेला भेसळपणा दूर केला जातो. अर्थात कोलेस्टेरॉल वाढले असेल वा रक्त जाडसर झाले असेल तर ते काही फळं खावून वा जिनस कावून दूर केले जाते. इथं रक्त फळाच्या माध्यमातून शुद्ध होतं तर तिथं मन किर्तन, प्रवचन व सुविचाराने शुद्ध होतं. मनालाच शुद्ध करण्यासाठी स्वातंत्र्य असतं व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीच प्रजासत्ताक असतं. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. याबाबत संत रोहिदास म्हणतात, ‘मन चंगा तो कटौती मे गंगा’ त्यानुसारच समर्थ रामदासांनी मनाचे महत्व लक्षात घेऊन म्हटले की मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. एवढे मनाचे महत्व आहे. मन जर चांगले असेल तर आपल्याला कोणताच आजार छळत नाही.

सर्व प्रकारच्या व्याधींपासून आपण अलिप्त राहू शकतो.
आज भारतीय प्रजासत्ताक. भारतीय प्रजासत्ताकाचा छ्यात्तरवा दिवस. भारतात प्रजासत्ताक स्वरुपाचं राज्य सव्वीस जानेवारी एकोणविसशे पन्नास पासून अस्तित्वात आलं. त्यापुर्वी भारतात प्रजासत्ताक नव्हतं.
प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालविलेले राज्य. असे राज्य हे सगळे देशच चालवत होते. हे सगळं बरोबर होतं. मग भारतात अशी कोणती गरज पडली की भारताला लिखीत राज्यघटना तयार करावी लागली व ती राज्यघटना लिहून ती सव्वीस जानेवारी एकोणविसशे पन्नासला भारतीय जनतेला बहाल करावी लागली? हा एक विचार करण्यालायकच प्रश्न. तो कोणाच्याही मनात अगदी सहजच उद्भवेल.
भारत प्रजासत्ताक होण्यापुर्वी तो आधीपासूनच अंधश्रद्धेच्या बुरख्यात जगत होता. शिवाय या भारतातील बरीचशी मंडळी ही मेंढरागत वागत होती. ती हुशार नव्हती व ती एका अतिशय हुशार माणसांच्या बोलण्यावर वा दिशा दाखविण्यावर विश्वास ठेवणारी होती. जी माणसं ढोंगी होती. बरीचशी मंडळी याच ढोंगी माणसांच्या प्रभावात लिप्त होती. ती देवादिकात व अंधश्रद्धेत रमत होती. त्यातच अंगात येणे याही गोष्टी वारंवार घडत. मांत्रीकांचे प्रस्थ माजले होते. हे मांत्रीक एखादा आजार आल्यास त्यावर अमूक भूत लागला वा एखादा व्यक्ती मरण पावल्यास अमूकानं मुठ मारली अर्थात करणी केली. अशा आशयात लोकं गुरफटले जात होते. हा मांत्रीक गुप्त धन मिळवून देतो असे सांगून परीसरातील जीवंत मुलांचा नरबळी देत असे व ते जाहीरही होवू देत नसे. मांत्रीक हा दगडाच्या देवांना पुढे करुन सामान्य माणसांना लुटत असे. एवढे लुटत असत की सामान्य माणसांचं जगणं अति अवघड होवून जाई. शिवाय केशवेपण, बालविवाह, विधवांच्या विवाहास बंदी या सर्व गोष्टी कायदे बनले तरी समाजात सुरुच होत्या. त्यातच लोकं समाजाला दोष देत होते. जे सामान्य जीवन जगायचे. अंधश्रद्धेवर विश्वास करणाऱ्या या समाजात त्यावेळच्या काळात संबंधक्रांतिकारांनी रणशिंग फुंकले. त्यांच्यात प्रयत्नाने भारत स्वतंत्र झाला. हे जरी खरं असलं तरी समाजाला नव्हे तर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. परंतु समाज सुधारला नव्हता. अशा समाजाला सुधारण्यासाठी वा त्यांना योग्य दिशा दाखविण्यासाठी भारतात काही नियमांची गरज होती. ज्या नियमानुसार देश चालेल. देशाला चालता येईल. तेच नियम म्हणजे घटना व ती राज्यासाठी लागू झाली होती. म्हणून ती राज्यघटना. भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणविसशे पन्नासला लागू झाली.
भारताला राज्यघटनेची गरज जेव्हा भासली. तेव्हा एक बैठक भरली. ती राज्यघटनेची आढावा बैठक होती. राज्यघटना ही लिखीत स्वरुपाची असावी की अलिखीत स्वरुपाची? त्यातच तीन देशाच्या राज्यघटना अभ्यासल्या गेल्या. इंग्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड. इंग्लंडमध्ये अलिखीत राज्यघटना होती. अमेरिकेत लिखीत पण परिदृढ राज्यघटना होती. स्वित्झर्लंडमध्ये परीवर्तनशील स्वरुपाची राज्यघटना होती. शिवाय राज्यघटना कोणती स्विकारावी यावर चर्चा झाली. अशा प्रकारचे वादविवाद त्या काळात निर्माण झाल्यानंतर मग ठरलं की आपण अलिखीत राज्यघटना ठेवावी. कारण ज्या देशानं आपल्यावर एवढे वर्ष राज्य केलं. त्या देशाची राज्यघटना ही अलिखीत स्वरुपाची होती. परंतु काही मंडळी म्हणत होती की राज्यघटना ही लिखीत स्वरुपाची असावी. इंग्लडचं जावू द्या. त्यानंतर कोण लिहिणार यावर विचारविमर्श झाला व पाच लोकांची समिती बनली. ज्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपल्या अथक परीश्रमातून राज्यघटना लिहिली. ज्या राज्यघटनेतून त्यांनी अंधश्रद्धा कायमच्या वगळल्या. विशेष म्हणजे त्यांनी राज्यघटनेत मांत्रीकतेचा समावेश केला नाही. तसंच राज्यघटनेत त्यांनी कोणत्याही धर्माला विशेष महत्व दिले नाही. कोणत्याही व्यक्तीला विशेष महत्व दिले नाही. सामान्य लोकांचा त्यात विचार केल्या गेला. त्यातच त्या राज्यघटनेतून स्री पुरुष भेदभावच नाही तर स्री पुरुष, स्पृश्य अस्पृश्य, गरीब श्रीमंत हाही भेदभाव मिटवला.
आज राज्यघटनेतून अंधश्रद्धा दूर पळाल्या आहेत. भेदभावही तेवढेच दूर पळाले आहेत. माणसाचे माणूसपण जपले जात आहे. आजच्या या राज्यघटनेत ना मांत्रिकाला थारा आहे, ना मांत्रिकांच्या मांत्रीक विद्येला. ना आता कोणी गुप्तधनासाठी नरबळी म्हणून बालकांचा बळी देत. ना केशवेपण प्रथेचं पालन करुन स्रियांच्या पती निधनानंतर तिला विद्रूप करत. ना कोणी आपल्या कन्येचा बालविवाह करीत. आज विधवेलाही दुसरा विवाह करुन आपले जीवन जगण्याचा अधिकार आहे. एवढंच नाही तर आज कोणाचंही आपल्या पतीचं पटत नसल्यास फारकत घेता येते. आज कोणीच कोणाची नोकरी खावू शकत नाही. तसाच कोणीच कोणाचा हक्कंही हिरावून घेवू शकत नाही. एवढी स्वतंत्र्यता आहे. मात्र हे सगळं नियमांना धरुन घडतं. कारण भारत प्रजासत्ताक आहे.
आज कुणीही कायद्यासमोर नव्हे तर भारतीय प्रजासत्ताकापेक्षा मोठा नाही. कुणीही स्वातंत्र्याचा उपभोग घेतांना कोणावरही अत्याचार करु शकत नाही. तसंच कुणीही स्वातंत्र्याचा आपल्या स्वार्थासाठी उपभोग घेवू शकत नाही. अन् समजा कुणी तसं करु म्हटल्यास भारतीय, प्रजासत्ताक त्यांच्या मुसक्या आवळते. याचाच अर्थ असा की स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीच प्रजासत्ताक आहे. स्वैराचारी वागण्यासाठी वा स्वैराचारपणे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी भारतीय प्रजासत्ताक नाही. हे मात्र खरं.

     अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Continue Reading

Previous: प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीन मोबाईल खरेदीवर आकर्षक सवलती..
Next: सत्यम क्लॉथ सेंटर येथे: साड्यांची स्पेशल ऑफर सुरु..

Related Stories

World-Mental-Health-Day-2025-Wishes-Quotes-share-on-whatsapp-instagram-facebook_
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी

किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या मानसिक आरोग्य समस्येत पालकांची भूमिका

NewWaniDiary 02/03/2026
SAVE_20260125_163505
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी

संविधानावर कोणीही ताशेरे ओढू नये

NewWaniDiary 25/01/2026
IMG-20221224-WA0015-1024x825
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी

केवळ जागरूक आणि सावध ग्राहकच सुरक्षित

NewWaniDiary 24/12/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.