▪️ उड्डाणपुलाच्या परिसरात रस्त्यावर खड्डे व रात्री स्ट्रीट लाईट बंद..
▪️ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना गैरसोईचा सामना..


वणी शहरातील चिखलगाव रेल्वे गेट आणि वरोरा रोडवरील रेल्वे गेटजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाठिकाणी रस्तेवर खड्डे पडले आहेत आणि रात्री स्ट्रीट लाईट बंद आहेत. यामुळे परिसरात अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.


या समस्येमुळे गरोदर महिला, आजारी रुग्ण, विद्यार्थी आणि पायदळ प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.



प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी यावेळी नागरिकांनकडून मागणी होत आहे.
