Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • गणराज्य दिनानिमित्त हरदोना खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम; अनैशा वाहन चालक कामगार संघटनेतर्फे शिक्षकांचा सत्कार
  • चंद्रपूर

गणराज्य दिनानिमित्त हरदोना खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम; अनैशा वाहन चालक कामगार संघटनेतर्फे शिक्षकांचा सत्कार

NewWaniDiary 29/01/2026

हरदोना खुर्द (ता. राजुरा | जि. चंद्रपूर): भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, हरदोना खुर्द येथे सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने शाळेतील शिक्षक व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामपंचायत उपसरपंच एकनाथ मुठ्ठलकर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

हा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर मुटलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष महादेव वाटेकर, ग्रामपंचायत उपसरपंच एकनाथ मुठलकर, संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, महाराष्ट्र राज्य सल्लागार अशोककुमार उमरे, मुख्याध्यापक सुधाकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा मेघश्याम बोबडे, शाळा समिती सदस्या मीराबाई उद्धव कोडापे, छाया दिलीप घोरपडे, तसेच सुष्मा किशोर गोहोकार, आशा विनोद देवेकर, करिष्मा दीपक कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्याध्यापक सुधाकर जाधव, शिक्षक नरेश मंडोगडे, मनीष मंगरूळकर, शिक्षिका तृप्ती टिकले, एन.सी.एफ. पुस्तक परी संजिवनी पेरगार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर मुटलकर, अंगणवाडी सेविका इंदिराताई टोंगे, ज्योत्स्ना माहुरे यांचा अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास अनैशा वाहन चालक कामगार संघटना, हरदोना खुर्द (महाराष्ट्र राज्य एन.जी.पी. ५७३३) चे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व संघटनेचे राज्य सल्लागार अशोककुमार उमरे, युवा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर चंपतभाऊ राजुरकर, तसेच संघटनेचे कार्यकर्ते संजय साळवे, प्रमोद देवेकर, आकाश ताकसांडे, अविनाश उपरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गणराज्य दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांना गावातील नागरिकांच्या वतीने प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाला गावातील लहान-थोर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.

Continue Reading

Previous: बोरगांव–मेढोली जि.प. शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Next: वणीतील मयूर मार्केटिंगमध्ये नामांकित इलेक्ट्रॉनिक ब्रँड्सवर आकर्षक सवलत

Related Stories

SAVE_20260203_123401
  • चंद्रपूर

गणराज्य दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाविरोधात कठोर कारवाईची मागणी

NewWaniDiary 03/02/2026
SAVE_20260107_144452
  • चंद्रपूर

ऐतिहासिक बुद्धभूमी; गडचांदूर येथे ८ जानेवारीला जागतिक धम्मध्वज दिन सोहळा

NewWaniDiary 07/01/2026
SAVE_20251129_243104
  • चंद्रपूर

हरदोना खुर्द येथे; संविधान सन्मान दिन संपन्न!

NewWaniDiary 29/11/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.