
चंद्रपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चंद्रपूर जिल्हा तर्फे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त भव्य प्रबोधन व गीतगायनाचा बहारदार कार्यक्रम तसेच भोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक 15 व 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत चांदा क्लब ग्राऊंड, मेन रोड, दिशाभूमी, चंद्रपूर येथे होणार आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक कलाकार सुरज आत्राम, संदीप नागले व स्वाती गोरेवार यांची विशेष गीतगायनाची सादरीकरणे होणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. मोहनलाल पाटील, राष्ट्रीय महासचिव आरपीआय भूषविणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अनेक मान्यवर पदाधिकारी, जिल्हा नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार शीतलताई खाडे, जिल्हा अध्यक्षा वर्धा अध्यक्षा महिला असतील.
या निमित्ताने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रबोधन व गीतगायनाचा लाभ घ्यावा तसेच भोजनदानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
