Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • भूमीहीनाच्या सत्याग्रहाचा विसर हा बाबासाहेबांच्या पक्ष संघटना मोडकळीस येण्याचे अन्य कारणांपैकी एक कारण..
  • चंद्रपूर

भूमीहीनाच्या सत्याग्रहाचा विसर हा बाबासाहेबांच्या पक्ष संघटना मोडकळीस येण्याचे अन्य कारणांपैकी एक कारण..

NewWaniDiary 17/04/2025
  • अशोककुमार उमरे

साऱ्या जगात दखलपात्र ठरलेल्या आणि भूमीहीनाच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून भारतातील तमाम दलित, पीडित आदिवासी यांना अन्नपाण्याला लावलेल्या बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना पडलेला विसर हा बाबासाहेबांच्या पक्ष संघटना मोडकळीस येण्याचे अन्य कारणांपैकी एक प्रमुख कारण आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अशोककुमार उमरे यांनी व्यक्त केले. ते मौजा हरदोना खुर्द त. राजुरा जि चंद्रपूर येथील ग्रामपंचायतच्या समाज भवनाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

बाबासाहेबांनी लोकशाही संविधानाच्या रक्षणासाठी लिहिलेल्या खुल्यापत्राच्या निकषाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेता निवडीची प्रक्रिया राबविल्यास आंबेडकरी चळवळीची एकसंघ संघटनशक्ती निर्माण होऊन आंबेडकरी समाज सत्तेकडे वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन कार्यकर्ते सुरजभाऊ उपरे यांनी व्यक्त केले.

भारतीय राज्यघटनेचे खऱ्याखुऱ्या अर्थाने पालन करण्यासाठी आणि आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सर्व भारतीयांनी सामील एकसंघ संघटनशक्तीने काम केले पाहिजे असे पंचशील बहुउद्देशीय संस्था, हरदोना खुर्दचे संस्थापक अध्यक्ष गौतम भसारकर यांनी प्रतिपादन केले.

बाबासाहेबांच्या विचारांची लढाई सर्वच लढतो म्हणतात परंतु जोपर्यंत आंबेडकरी चळवळीची संविधानाच्या मापदंडानुसार एकसंघ संघटनशक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत इथला आंबेडकरी समाज आणि आदिवासी समाज हे परावलंबी जीवन जगत राहणार आहेत, असे प्रतिपादन आदिवासी समाजातील रिपब्लिकन कार्यकर्ते प्रविण गेडाम यांनी व्यक्त केले.

उपसरपंच एकनाथ मुठलकर, ग्रामपंचायत सदस्या ज्योतीताई धोंगडे, पोलिस पाटील धनपाल उपरे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेशमाताई खोब्रागडे यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले.

रेशमाताई खोब्रागडे समाज अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अशोककुमार उमरे, गौतम भसारकर, पोलिस पाटील धमपाल उपरे, उपसरपंच एकनाथ मुठलकर,प्रविण गेडाम, ग्रामपंचायत सदस्य ज्योतीताई धोंगडे उपस्थित होते.

बाबासाहेबांच्या १३४ व्या जयंतीनिमित्तच्या हरदोना खुर्द या गावातील प्रमुख मार्गावरून बाबासाहेबांचा जयजयकार करत सायंकाळी सहा वाजता पासून मिरवणूक काढण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन दिनेश गायकवाड यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद उपरे, सुनंदा शिंदे, संजिवनी पेरगर, दिनेश गायकवाड, महादेव दुर्गे, वंदना दुर्गे, स्वप्नील दुर्गे, सतीश शामवेल शिंदे, सुनंदा सतीश शिंदे, आर्यन सतीश शिंदे, संविधान सतीश शिंदे, संजीवनी पेरगर,वेदांती पेरगर, ललिता रामटेके, चंद्रप्रभा नारायण उपरे, रेशमाबाई खोब्रागडे, केशरबाई कातकर, रजनीकांत कातकर, उपलव उपरे, रूतूजा उपरे, ज्योती उपरे इत्यादींनी योगदान दिले.

राष्ट्रगीताने कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी एकमेकांशी हस्तांदोलन करून बाबासाहेबांच्या जयंतीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Continue Reading

Previous: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उपरवाही शाखा फलकाचे अनावरण..
Next: डॉ. आंबेडकर जयंती निमित्त राजूर ग्रामपंचायत येथे व्याख्यान संपन्न..

Related Stories

SAVE_20260203_123401
  • चंद्रपूर

गणराज्य दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाविरोधात कठोर कारवाईची मागणी

NewWaniDiary 03/02/2026
SAVE_20260127_164735
  • चंद्रपूर

गणराज्य दिनानिमित्त हरदोना खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम; अनैशा वाहन चालक कामगार संघटनेतर्फे शिक्षकांचा सत्कार

NewWaniDiary 29/01/2026
SAVE_20260107_144452
  • चंद्रपूर

ऐतिहासिक बुद्धभूमी; गडचांदूर येथे ८ जानेवारीला जागतिक धम्मध्वज दिन सोहळा

NewWaniDiary 07/01/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.