
वणी : शहरातील दामले फैलतील नगरपालिका शौचालयासमोर असलेली पाण्याची इलेक्ट्रिक टुपवेल बोर खूप दिवसांपासून बंद असल्याने स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. तापमान वाढल्यामुळे या समस्येने गंभीर रूप घेतले आहे,ही बोर नगर पालिकाचे असून यामुळे नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी कमी असल्यामुळे, स्थानिक गरीब नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते, जे त्यांच्या आर्थिक आणि शारीरिक परिस्थितीला अधिक अवघड बनवते. याशिवाय, अन्य नगरपालिकेतील समस्याही गंभीर होण्याच्या मार्गावर आहेत.
पाणी पुरवठा विभाग, नगर परिषद वणी, आणि संबंधित अधिकारी यांना विनंती केली जाते की, कृपया या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन बंद असलेली बोर त्वरित दुरुस्त केली जावी. तसेच, या समस्येवर उपयुक्त उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा द्यावा. स्थानिक नागरिकांच्या वतीने ही मागणी करण्यात आलेली आहे.

