
नारी शक्ती गृप,अडेगांव ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अडेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या विशेष प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले समीर लेनगुळे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले रत्नमाला बोधे ( अहिल्या बाई होळकर समीती सदस्य) उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून संजय आत्राम (ग्रामपंचायत सदस्य), सदस्य (जि.प. शाळा व्यवस्थापन समिती अडेगांव) तसेच सिताराम पिंगे , अंकीत डोहे,शरद काळे, ममता माहूरे, प्रिया मांडवकर, संध्या टेकाम, तसेच शिक्षिका देवतळे व शिक्षिका नगराळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पन करून करण्यात आली, यांनतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर इतिहास अभ्यासक समीर लेनगुळे यांचे जाहीरव्याख्यान झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभम राऊत यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या अखेरीस संतोश पारखी, प्रणल गोंडे, राहूल पाचभाई, राजू चौधरी या सर्वांनी उपस्थित सर्व मान्यवर, व नागरीकांचे तसेच नारीशक्ती संघटने चे आभार मानले. व सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
