
वणी : शहरातील निर्गुडा नदीची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. गणेशपूर पुलाजवळ नदीत घाण पाणी साचत असून, मोट्या प्रमाणात कचरा साचुन आहे. आणि नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी जीवन असून वणी नगर पालिकेने यावर कोणतीही सुधारात्मक उपाययोजना केली नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

तीन वर्षांपासून नगर परिषद प्रशासन कार्यरत असतानाही, शहरातील दलित वस्त्यांची स्थितीही ठीक नाही. दामले फैलातील शैचालयाचे घाण पाणी आणि निर्गडा नदी लागत मोठे ले-आउटचेही गटारांचे पाणी नदीत मिसळत आहे.

पालिकेकडून गटारांचे पाणी जीर्ण होण्याकरिता कोणतीच सोई सुविधा केले गेले नाही. अशी या वणी शहराची स्थिती आहे. शैचालंय स्वच्छते निवेदन दिल्यानंतरही नगर पालिकेने काहीही सुधारणा केलेली नाही.
नगर पालिका प्रशासनाचे मनमानी कारभार सुरु असून सर्व सोई सुविधा श्रीमंतानाच देण्यात येत आहे. यामुळे नगर पालिका प्रशासनावर नागरिकांकडून आरोप होत आहेत.


