Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • मारेगाव
  • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मारेगाव येथे:आमरण उपोषण सुरू..
  • मारेगाव

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मारेगाव येथे:आमरण उपोषण सुरू..

NewWaniDiary 21/02/2025

मारेगाव : स्थानिक मारेगाव येथील तसेच पाथरी येथील महत्त्वपूर्ण प्रश्नावर येथील पंचायत समिती समोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ६७ वर्षीय नेते कॉ. पुंडलिक ढुमने हे दिनांक २० फेब्रुवारी २०२५ पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जो पर्यंत समस्या चे निराकरण करण्यात येत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असा निर्धार करण्यात आला आहे.

मौजा पाथरी येथील सरकारी स्मशान भूमीची जागा अतिक्रमण केल्याने ताबडतोब जागा मोकळी करावी, स्मार्ट मीटर लावणे बंद करा, रस्त्यावरील बेशिस्त वाहनांमुळे रहदारीला अडथळा होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो आहे, त्यामुळे तो व्यवस्थित करावा, रस्त्यावर भरणारा आठवठी बाजार अन्यत्र भरवावा आदि मागण्यांवर माकपचे कॉ. पुंडलिक ढुमने हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

गावाचा सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात, म्हणत लढेंगे तो जितेंगे हा नारा देत आमरण उपोषण सुरू करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, तालुका सचिव कॉ. रामभाऊ जिद्देवार, डॉ. श्रीकांत तांबेकर, सुदर्शन टेकाम आदि उपस्थित होते.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मारेगावात आमरण उपोषण सुरू करताच प्रशासन कामाला लागले असून प्रश्न ताबडतोब सोडविण्यात येईल असे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.

Continue Reading

Previous: वणी तहसील परिसरातील सेतु सुविधा बंद असल्याने नागरिक त्रस्त..
Next: भाकपचे मारेगाव तालुका त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न!

Related Stories

SAVE_20251016_145848
  • मारेगाव

“बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे” — दत्ता डोहे

NewWaniDiary 16/10/2025
SAVE_20250728_212338
  • मारेगाव

मारेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसचे धडाकेबाज अर्धनग्न आंदोलन

NewWaniDiary 28/07/2025
SAVE_20250418_143124
  • मारेगाव

मारेगाव येथे: जागतिक महिला दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न..

NewWaniDiary 18/04/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.