Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य ‘एक वही एक पेन’ अभियान…
  • चळवळ
  • वणी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य ‘एक वही एक पेन’ अभियान…

NewWaniDiary 05/12/2024

▪️ दि.६ डिसेंबर रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वणी येथे: यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या वतीने आयोजन…

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करताना मोठमोठे पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्याऐवजी ‘एक वही व एक पेन’ वाहून आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्याचा संकल्प यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या(YIOAM) तरुणाईने केला आहे. सोशल मीडियातून सध्या याचा जोरदार प्रचार सुरू असून तरुण पिढीच्या या भूमिकेला वाढता पाठिंबा मिळत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रतिवर्षी येत असतात. अभिवादन करताना हे आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणावर पुष्पहार, पुष्पचक्र, मेणबत्ती व उदबत्ती पुतळ्याजवळ घेऊन येतात. पुतळ्याजवळ वाहण्यात येणाऱ्या या वस्तूंची विल्हेवाट लावताना आयोजकांवर अतिरिक्त ताण येत असतो. यातून मार्ग काढतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाच्या मंत्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मंडळ, संस्था आणि संघटनांनी प्रत्येकी केवळ एकच पुष्पहार, पुष्पचक्र, मेणबत्ती आणि उदबत्ती पुतळ्याजवळ घेऊन जावी व ऊर्वरित लोकांनी दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी, सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत “एक वही व एक पेन” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील पेंडॉल मध्ये देऊन महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या (YIOAM) च्या तरुणाईने सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन केले आहे.

या माध्यमातून जमा होणाऱ्या शालेय साहित्याचे वितरण समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात यावे आणि पुतळ्याजवळील व्यवस्था पाहणाऱ्या सर्व संघटनांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. सोबतच पुतळ्याजवळ येताना महापरिनिर्वाण दिनाचे पावित्र्य, स्वच्छता तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी यंग इंडिया ऑफ आंबेडकर मुव्हमेंट(YIOAM) या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीच्या वणी तालूकाध्यक्ष पदी चंपत मणिराम पाचभाई,आणि महीला तालूका आघाडी प्रमूख पदी चंद्रकला मारोती ऊराडे ह्यांची नियूक्ती
Next: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य ‘एक वही एक पेन’ अभियान…

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.