▪️भितीदायक देखावा अन् आकर्षक रोषणाई; गुफा पाहण्यासाठी भाविकांची दररोज गर्दी..

वणी (प्रतिनिधी) : वणी येथील चिखलगाव परिसरात जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाने उभारलेली भुतिया गुफा सध्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. भितीदायक देखावा आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे या गुफेला विशेष रंगत आली आहे.
वणी तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांतून हजारो भाविक दररोज ही गुफा पाहण्यासाठी चिखलगाव येथे येत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये या देखाव्याबाबत उत्सुकता असून, परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यू वणी डायरी न्यूज पोर्टल
