▪️ दिक्षा नगराळे मित्रपरिवार राळेगाव द्वारा आयोजन दि. ६ डिसेंबर रोजी, सकाळी 9 ते सायं. 6 वाजेपर्यंत स्थळ: डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक राळेगाव येथे…

भारताच्या सर्व सामाजिक दुखण्यावर शिक्षण हेच प्रभावी औषध असेल असे स्वतः डॉ.बाबासाहेब सांगून गेले आहे. आज भारतात शिक्षणातून विद्यार्थी गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे सरकारला प्रभावीपणे शक्य होताना दिसत नाही. त्याकरिता अनेक पातळीवर प्रयत्न सुरू आहे. शेतकरी कष्टकरी कामगार हा पालक वर्ग असलेला विद्यार्थी आम्ही सुविधा अभावी आम्ही हिरमुसून जातांना बघितला आहे . एकीकडे अभिवादन व हाय फुलांचा खच पडतो आहे. आणि दुसरीकडे आपले उद्याचे देशाचे भविष्य कोमेजुन जातांना पाहणे अत्यंत वेदनादायी होते, एक वही एक पेन संकल्पना इथुनच जन्म घेते या संकल्पनेनुसार डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण किमान वीस रुपयाचा हार फुल घेतो त्याच सोबत त्याच मूल्याचे एक वही एक पेन डॉ बाबासाहेबांना अभिवादन म्हणून आमच्याकडे जमा करा आम्ही ते सर्व साहित्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडे पोहचू त्यांच्या शिक्षणाला तुमच्या वतीने हातभार लावू ते विदयार्थी शिक्षित होतील आयुष्यात मोठ्या पदावर विराजमान होतील आणि बाबासाहेबांचे उच्चशिक्षित समाजचे स्वप्न पूर्ण करतील या क्रांतिकारी उपक्रमात सहभागी व्हा आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा असे आव्हान सामाजिक कार्यकर्त्या दिक्षाताई नगराळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे ..