Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • यवतमाळ
  • शिवविवाहात महामानवांच्या विचारांचा जागर – यवतमाळ व वरोरा वासियांनी अनुभवला आदर्श शिवविवाह
  • यवतमाळ

शिवविवाहात महामानवांच्या विचारांचा जागर – यवतमाळ व वरोरा वासियांनी अनुभवला आदर्श शिवविवाह

NewWaniDiary 09/12/2025

वणी (प्रतिनिधी) : लोप पावलेल्या प्राचीन, वैभवशाली, मातृसत्ताक निसर्गपूजक सिंधू-बळी-शिवसंस्कृतीची ओळख समाजाला करून देण्याचा प्रयत्न सालेकर परिवाराने आपल्या मुलाच्या शिवविवाह विधीमधून यशस्वीरीत्या साधला.

यवतमाळ येथील संदीप मंगलम येथे रामचंद्र सालेकर यांच्या मुलगा वैष्णव आणि प्रकाश कोल्हे यांची कन्या अंकिता यांचा शिवविवाह पारंपरिक विवाहपद्धतीला फाटा देत नुकताच संपन्न झाला. अनेक पाहुण्यांसाठी हा विधी अत्यंत अनोखा व अर्थपूर्ण अनुभव ठरला.

विवाहावेळी होम–हवन का नाही? वधू उजव्या बाजूला का? अंतरपाटाची गरज का नाही? अक्षताऐवजी फुलांचा वर्षाव का? पारंपरिक मंगलाष्टकाऐवजी शिवसप्तक का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक प्रविण भोयर आणि स्वखुद्द वराचे वडील रामचंद्र सालेकर यांनी दिली. त्यामुळे उपस्थित पाहुण्यांकडून या आगळ्यावेगळ्या विवाहविधीचे फार कौतुक होत असल्याचे स्पष्ट दिसून आले.

शिवविवाह विधीत जिजाऊ वंदना तसेच शिवसप्तक गानाची सुंदर सादरीकरणे शिवसेवक गानोडे सर यांनी केली.

दुसऱ्या दिवशी जिजाऊ पूजन व शिवस्वागत

विवाहाच्या दुसऱ्या दिवशी वरोरा येथील सालेकर यांच्या स्वगृहात वरपक्षातर्फे जिजाऊ पूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे संचालन शिवसेवक प्रशांतजी गोखरे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील निवडक अभंग वाचनाने केले.

सायंकाळी वरोरा येथील द्वारकाधीश लॉनमध्ये सालेकर परिवाराकडून शिवस्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परिसरात संत-महापुरुषांच्या प्रतिमा व त्यांच्या प्रेरणादायी सुवचनांचे बॅनर्स हे विशेष आकर्षण ठरले.

स्वागत समारंभात वधू-वरांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम अध्यक्ष सोनूताई येवले यांचा सत्कार करण्यात आला तसेच वृद्धाश्रमाला दहा हजार रुपयांचे शिवदान देण्यात आले.

समाजातून दाद, आदर्श म्हणून चर्चा

या शिवविवाह व शिवस्वागत समारंभाबाबत पंचक्रोशीमध्ये सर्वत्र कौतुक होत असून, “घेण्यासारखा आदर्श समारंभ” म्हणून चर्चा रंगत आहे.

Continue Reading

Previous: प्रामाणिकतेणे निर्भयपणे जगणे इतके कठीण आहे का?
Next: सम्राट अशोक नगरमध्ये जुने बौद्धविहार जमीनदोस्त; बांधकाम साहित्याची चोरी केल्याप्रकरणी तक्रार

Related Stories

ChatGPT Image Jun 22, 2026, 11_43_12 AM_11zon
  • यवतमाळ

HTBT कापूस बियाण्यावरील बंदीविरोधात शेतकरी संघटनेचे आंदोलन; खडकी येथे प्रतिबंधित बियाण्याची प्रतिकात्मक लागवड

NewWaniDiary 22/06/2026
SAVE_20260320_214752
  • यवतमाळ

महाड चवदार तळे सत्याग्रह शिल्पाकृतीला अभिवादन

NewWaniDiary 20/03/2026
SAVE_20260212_191015
  • यवतमाळ

देशव्यापी संप ला पाठिंबा दर्शवित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

NewWaniDiary 13/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.