Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी
  • वणी

वणी तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी

NewWaniDiary 12/02/2025

▪️ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

वणी : येथील तहसील परिसर हे तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असून ह्या ठिकाणी एकच जागेवर सर्वच अधिकाऱ्यांचे कार्यालय तसेच न्यायालय सुद्धा असल्याने खेड्यापाड्यातील व शहरातील गरजू जनता येत असते. त्यांना लागणारी काही महत्वाची प्रमाणपत्रे काढण्याकरिता सेतू सुविधा केंद्र हे ह्याच परिसरात शासनाच्या वतीने उघडलेली आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून हे सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने लोकांना पायपिट करावी लागत आहे आणि त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने येथील उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ताबडतोब तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कागदपत्रे काढण्याकरिता तहसील परिसरातील असलेल्या सेतू सुविधा केंद्रात सोईचे असल्याने येत असतात. त्यामुळे ते इतर कुठेही न जाता शासकीय कार्यालयातच कागदपत्रे काढण्याकरिता येत असतात. परंतु कागदपत्रे काढण्याकरिता आलेल्या नागरिकांना हे तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना आल्या पावले परत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास करावा लागत असून परिणामी त्यांना आर्थिक भुर्दंड सुद्धा सोसावा लागत आहे.

नागरिकांची उपरोक्त ही समस्या लक्षात घेता तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र त्वरीत सुरू करावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, कॉ. ॲड. दिलीप परचाके, ॲड. विप्लव तेलतुंबडे, ॲड. अविनाश बोधाने, ॲड. प्रवीण पुरी, ॲड. अमान एम आरिफ, कॉ. कवडू चांदेकर, कॉ. लालू दडांजे, कॉ. भीमराव आत्राम आदींनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना केली आहे.

Continue Reading

Previous: वणीतील:रहिवाशांची तहसीलमधील सेतु सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी!
Next: आशा व गटप्रवर्तक संघटना सिटूच्या जिल्हा अध्यक्षपदी ॲड. कुमार मोहरमपुरी तर जिल्हा सचिवपदी उषा मुरखे यांची निवड

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.