▪️ महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विजय नगराळे यांनी केले..

वणी – शहरात ९ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गर्भाशय कॅन्सर जागरूकता व HPV लस याबाबत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आयोजित केले आहे.
शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. संचिता विजय नगराळे (M.B.B.S., M.D., D.G.O., Goldmedalist) उपस्थित राहतील. तसेच गर्भधारणेपूर्वीच्या बिजसंस्कार विधीवर वैद्य सुवर्णा चरपे मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिर ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता, डॉ. नगराळे हॉस्पिटल, नांदेपेरा रोड, न.प. शाळा क्र. ५ जवळ, वणी येथे होणार आहे. महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे यांनी केले आहे.


