
वणी : यवतमाळ पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट न टाकता, त्या माध्यमातून भडकावू व्हिडिओ व माहिती प्रसारित करणे टाळावे. सायबर पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवून असणार आहेत आणि अशा कृत्यांवर कडक कारवाई केली जाईल. काही शहरांमध्ये सोशल मीडियावर अशा पोस्ट प्रसारित होण्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी शांतता राखण्याचे आणि अनुशासन भंग करणारे कृत्य टाळण्याचे नागरिकांना सांगितले आहे.

