Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरात;अनेक ठिकाणी अवैध रेती मोठ्या ट्रकांनी टाकली जात..
  • वणी

वणी शहरात;अनेक ठिकाणी अवैध रेती मोठ्या ट्रकांनी टाकली जात..

NewWaniDiary 23/03/2025

वणी : शहरातील सामान्य नागरिकांना घर बांधण्यासाठी रेती मिळवणे कठीण झाले आहे, कारण अधिकृत रेती घाट बंद असल्यामुळे शहरात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शहरात श्रीमंतांच्या ले-आउट आणि कॉलण्यांमध्ये अवैध रेती मोठ्या ट्रकांनी टाकली जात आहे. काही ठिकाणीसुद्धा रेती रात्री रस्त्यावरील टाकल्या गेली आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असतानाही, तस्करी चालूच आहे.

वणी विधानसभा क्षेत्रातील सिमा लागतच्या नदीतून रात्री रेती उत्खनन केल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही तस्करी वाढली आहे, आणि सामान्य नागरिकांना रेती मिळवणे कठीण झाले आहे. या रेती तस्कर कुंभकर्णावर कारवाई होईल का?

राजकारण्यांशी संगनमत करून तस्कर रेती साठवून ती जास्त दराने विकत आहेत. प्रशासनाला अवैध रेती तस्करीवर कारवाई करण्याची आणि नदीतील साठवलेली रेती जप्त करून नदीत सोडण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

हे पाहा: ले-आउट आणि कॉलण्यांमधील अवैध रेतीचे छायाचित्र..👇👇

Continue Reading

Previous: घूगूस येथील;सभागृहाची दयनीय अवस्था झाली असून सौंदर्यकरण्याची मागणी..
Next: जनतेचा मूलभूत अधिकार व सुरक्षेसाठी शहीद भगतसिंगांचा संघर्ष होता – कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.