
वणी : शहरातील न.प. शाळा क्र. ३ जवळील चढ-उताराच्या रस्त्यावर रोज अपघात होत आहेत, आणि स्थानिक नागरिकांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. गरोदर महिलांना रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावालागत आहे.
या रस्त्याच्या कामामध्ये संबंधित असलेले इंजिनियर, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींनी कारभारातील असमान्यतेसाठी जबाबदार असल्याचे आरोप केले जात आहेत.

या मुख्य मार्गावर लहान मोठे शाळेचे विध्यार्थी व अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जात असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेची चिंता आहे. संबंधित प्रशासनाने या रस्त्याच्या सुधारणा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
