Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • जिजाऊ रथयात्रचे वणी शहरात उद्याला आगमन..
  • वणी

जिजाऊ रथयात्रचे वणी शहरात उद्याला आगमन..

NewWaniDiary 09/04/2025

वणी : संपूर्ण भारत देश्यामध्ये संस्कृतिक दृष्टया प्रबळ असणाऱ्या मराठा सेवा संघ या संघटनेची स्थापना १ सप्टे १९९० ला अकोला येथे करण्यात आली. चार्वाक महावीर शिव बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन सुरू झालेल्या, बौद्ध, कम्युनिस्ट, सत्यशोधक अश्या अनेक पुरोगामी चळवळीचा वैचारिक आधार घेऊन क्रांतीपुरूष युगनायक पुरुषोत्तम खेडेकर यांनी स्थापन केलेल्या या संघटेने जात,पात,धर्म,पंथ,प्रदेश या पलीकडे जाऊन ” मराठा ” या एका व्यापक शब्दामध्ये हे संघटन सुत्रित केले. समाजामध्ये अनिष्ट आणि विकृत शक्तिकडून होणाऱ्या विविध प्रकारच्या शोषणाचा प्रतिकार करण्यासाठी हे एक प्रबळ वैचारिक संघटन सुरू केले.

कर्मचारी, महिला, तरुण, विद्यार्थी, शेतकरी, अश्या अनेक घटकांना एकत्रित करण्यासाठी विविध बत्तीस कक्षाची उभारणी केली. आज पर्यंत पस्तीस वर्षात अनेक क्रांतिकारी कार्य केलेल्या या संघटनेने आज राज्य आणि देश्यामध्ये अनेक प्रकारचे शोषण, विकृती, अत्याचार सुरू असताना या प्रबोधन पर्वाची गरज लक्षात घेत सौरभ खेडेकर यांनी अनेक समविचारी संघटना व व्यक्तींना सोबत घेऊन प्रबोधन यात्रा व मराठा जोडो अभियान सुरू केले आहे.
ही रथयात्रा दि. १८ मार्च ला भोसलेगडी, वेरुळ येथून सुरुवात झाली आहे. हे प्रबोधनपर्व पुढे ४५ दिवस चालणार आहे आणि समारोप १ मे ला लालमहाल पुणे येथे होणार आहे.
दरम्यान दि. १० एप्रिलला या रथयात्रेचे आगमन वणी येथे होणार आहे, या दरम्यान होणाऱ्या वणी शहरातील स्वागतासाठी तसेच प्रबोधन सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादासजी वागदरकर व जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष भारतीताई राजपूत व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी केले आहे.

Continue Reading

Previous: खासदार चषक:वणीतील शासकीय मैदानात रंगला कबड्डीचा थरार..
Next: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Related Stories

SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.