
मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने उत्सव स्त्रीत्वाचा! ध्यास समानतेचा.! या संकल्पनेखाली दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलन सोहळा विवेक पांडे, जाधव साहेब, डॉ. सपना केलोडे, हेमंत नरांजे, दीपक डोहने आणि चांद बहादे यांच्या हस्ते पार पडला.
मुख्य कार्यक्रम:
- पारंपरिक वेशभूषा स्पर्धा: स्पर्धकांनी सिंधुताई सपकाळ, भारतीय संस्कृती, शेतकऱ्यांची व्यथा, व महाविद्यालयीन जीवन यांसारख्या विषयांवर सादरीकरण केले.
- प्रथम: वैशाली वातीले (वणी)
- द्वितीय: मंगला भोयर
- तृतीय: मैने मॅडम (मारेगाव)
- नृत्य स्पर्धा (30 वर्षांवरील महिलांसाठी) – 12 एप्रिल रोजी उद्घाटन नंदेश्वर असुटकर व डॉ. विनोद आदेय यांच्या उपस्थितीत.
- समूह नृत्य
- प्रथम: अंबे ग्रुप
- द्वितीय: संतोषी मां ग्रुप
- तृतीय: हॅप्पी ग्रुप
- एकल नृत्य
- प्रथम: मेघा गेडाम
- द्वितीय: रचना किनाके
- तृतीय: मीरा दुपारे
- समूह नृत्य
- स्त्री सन्मान शोभायात्रा – 13 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरुवात. विविध राज्यातील लोकनृत्य, महाडच्या चवदार तळ्याचा देखावा, लाठी-काठी आणि ढोलताश्याच्या गजरात शोभायात्रा पार पडली.
उद्घाटन आमदार संजयभाऊ देरकर, सौ. किरण देरकर आणि आशिष खुलसंगे (राजे) यांच्या हस्ते फुगे उडवून करण्यात आले.
एकंदरीत कार्यक्रम स्त्री सन्मान, समानता व सांस्कृतिक जागृतीचा उत्तम संगम ठरला.

