Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी
  • सक्षम बहुउद्देशीय संस्था, वणी तर्फे “हरवलेलं भविष्य एका ऑनलाइन क्लिकमध्ये” या विषयावर जनजागृती अभियान..
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी

सक्षम बहुउद्देशीय संस्था, वणी तर्फे “हरवलेलं भविष्य एका ऑनलाइन क्लिकमध्ये” या विषयावर जनजागृती अभियान..

NewWaniDiary 22/06/2025

वणी प्रतिनिधी:
सध्या देशभरात ऑनलाइन गेमिंगच्या आहारी गेलेले तरुण-तरुणी आपलं शिक्षण, नोकरी, नाती, आणि आयुष्य गमावत आहेत. “फक्त फनसाठी” म्हणून सुरू झालेला हा नाद आता आधुनिक जुगाराच्या स्वरूपात समाजातील अनेक कुटुंबांचे भवितव्य उद्‌ध्वस्त करत आहे. विशेषतः रम्मी, फँटसी लीग, कॅसिनो यांसारख्या गेममुळे तरुण पिढी आत्महत्या, नैराश्य, आणि मानसिक विकारांकडे झुकत आहे.

या पार्श्वभूमीवर सक्षम बहुउद्देशीय संस्था, वणी तर्फे “हरवलेलं भविष्य एका ऑनलाइन क्लिकमध्ये” या विषयावर जनजागृतीपर लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक कर्मा तेलंग यांनी या लेखातून समाजाला साद घातली असून, पालक, शिक्षक, आणि नागरिकांनी एकत्र येऊन या डिजिटल जुगाराच्या विळख्यातून तरुणांना बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे.

या मोहिमेचा उद्देश आहे की –
तरुणांना वेळेत या व्यसनातून बाहेर काढणं
पालकांनी केवळ मोबाइल देऊन न थांबता मुलांशी संवाद साधणं
आणि संपूर्ण समाजाने सजग नागरिक म्हणून जबाबदारी स्वीकारणं

“मोबाइलवर गेम खेळून काही जिंकलं जात नाही, पण हरवतं मात्र खूप काही – म्हणून आजपासून सजग व्हा आणि खरं आयुष्य जगायला सुरुवात करा”, असं आवाहन कर्मा तेलंग यांनी केलं आहे.

या जनजागृती लेखाद्वारे सक्षम संस्था नव्या पिढीला एक सकारात्मक दिशा देण्यासाठी कटिबद्ध आहे.

Continue Reading

Previous: वणी शहरात घर कुलच्या नावाखाली अवैध रेती तस्करीचा उघडपणे धुमाकूळ – नागरिकांत तीव्र संताप
Next: वणी ग्रामीण रुग्णालयातील अडचणी कायम – नागरिकांत संतापाचा सूर

Related Stories

SAVE_20260729_163338
  • पृथ्वीरक्षण
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी

वन्यजीव जगतील तरच मानव जीवन वाचणार

NewWaniDiary 29/07/2026
SAVE_20260716_205349
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी

सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडायला हवं?

NewWaniDiary 16/07/2026
EWRdN83XYAAYRp1
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी

पुस्तकांची अमूल्य शक्ती ओळखा

NewWaniDiary 23/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.