Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा संघर्ष; संजय खाडेंच्या नेतृत्वशैलीची चर्चा
  • वणी

वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा संघर्ष; संजय खाडेंच्या नेतृत्वशैलीची चर्चा

NewWaniDiary 23/07/2025

▪️वणी तहसील कार्यालयावर धडक देत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. ..

वणी (प्रतिनिधी) – वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी-वीज समस्या आणि विविध स्थानिक अडचणी याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसतर्फे आज दि. 23 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी केले. आंदोलनादरम्यान शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुपारी 12 वाजता सुरू झालेल्या आंदोलनात विविध नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तहसील कार्यालयावर धडक देत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

मुख्य मागण्या:
✔ शेतकऱ्यांना एकरी ₹1 लाख नुकसानभरपाई
✔ रांगणा-भुरकी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, विहिरी बांधणे आणि एक्सप्रेस फिडर जोडणे
✔ दररोज प्रत्येक वॉर्डला स्वच्छ पाणीपुरवठा
✔ अखंड वीजपुरवठा, कृषी पंपांना दिवसा 12 तास वीज
✔ पीक विम्याची रक्कम त्वरित जमा करणे
✔ खते व बियाण्यांचे दर कमी करणे, घरकुलासाठी वाळू उपलब्ध करणे

संजय खाडे यांचे वक्तव्य:
“पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वणीकरांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आम्ही शेतकरी, कष्टकरी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढू. जर समस्या सुटल्या नाहीत, तर काँग्रेसतर्फे आणखी मोठे आंदोलन करण्यात येईल,” असे संजय खाडे यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात नरेंद्र ठाकरे, देविदास काळे, प्रशांत गोहकार, जयसिंग गोहोकर, राजाभाऊ पाथ्रडकर, विवेक मांडवकर ओम ठाकूर, प्रमोद वासेकर, सुनील वरारकर, शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, उत्तमराव गेडाम, सुरेश रायपुरे, तेजराज बोढे, संगीता खाडे, नीलिमा काळे, वंदना आवारी, सविता रासेकर, साधना गोहकार, शारदा ठाकरे, अनंत डंबारे, अशोक चिकटे, रवी कोटावार, अनंत चौधरी, जगदीश चौधरी, राजू अंकितवार, डेव्हिड परकावार, अंकुश मापूर, प्रवीण बद्दमवार, आकाश बदकी, यादवराव काळे, विनोद गोडे, बापूराव चिनावार, संतोष आत्राम, लक्ष्मण खडसे, राजू पाटणकर, प्रेमनाथ मंगाम, प्रमोद लोणारे, सुरेश बनसोड, प्रफुल्ल उपरे, हाफिस शेख, रवी धानोरकर, हरिभाऊ काकडे, प्रवीण वैद्य, सोमनाथ मंगाम, राकेश खुराना, गौरीशंकर खुराना, धनराज सातपुते, मुरलीधर ठाकरे, भीमराव चिडे, प्रफुल्ल विखनकर, वसंता आसुटकर, नंदू आसुटकर, रवी धानोरकर यांच्यासह वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो काँग्रेस समर्थक उपस्थित होते. या चळवळीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

Continue Reading

Previous: वणी शहरातील दलित वस्तीतील सार्वजनिक शौचालय दयनीय अवस्थेत; आरोग्याचा गंभीर प्रश्न
Next: शिष्यवृत्ती पोर्टलवरील त्रुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात – सामाजिक न्याय मंत्रालयाला दुरुस्तीची मागणी

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.