Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • मारेगाव
  • मारेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसचे धडाकेबाज अर्धनग्न आंदोलन
  • मारेगाव

मारेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसचे धडाकेबाज अर्धनग्न आंदोलन

NewWaniDiary 28/07/2025

वणी (प्रतिनिधी) – मारेगाव तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणाविरोधात काँग्रेसने 28 जुलै रोजी मारेगाव ते भालेवाडी दरम्यान धडाकेबाज अर्धनग्न आंदोलन छेडले. या आंदोलनात काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय खाडे, नरेंद्र ठाकरे, गौरीशंकर खुराना यांच्यासह वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक, शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

मारेगाव ते मार्डी तसेच इतर प्रमुख रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांनी भरलेले मार्ग व त्यामुळे होणाऱ्या अपघातांविरोधात हे आंदोलन करण्यात आले. प्रशासन व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून संतप्त कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येऊन लेखी आश्वासन दिले की लवकरात लवकर संबंधित रस्त्यांचे काम हाती घेण्यात येईल. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

परंतु, दिलेल्या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी झाली नाही, तर आणखी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Continue Reading

Previous: गरजू विद्यार्थ्यांसाठी स्माईल फाउंडेशनचा उपक्रम; शैक्षणिक साहित्य वितरित
Next: दामले फैल वॉर्डात पाण्याचा गंभीर प्रश्न – नागरीकांचा उद्रेक

Related Stories

ChatGPT Image Aug 25, 2026, 02_46_13 PM_11zon
  • मारेगाव

मारेगावच्या दोन प्रमुख चौकांत सिग्नल, सीसीटीव्ही व ट्राफिक पोलिसांची मागणी

NewWaniDiary 25/08/2026
ChatGPT Image Aug 14, 2026, 03_51_03 PM_11zon
  • मारेगाव

मारेगाव शहरातील वारंवार वीजखंडितीने नागरिक त्रस्त; सात दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

NewWaniDiary 14/08/2026
SAVE_20251016_145848
  • मारेगाव

“बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे” — दत्ता डोहे

NewWaniDiary 16/10/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.