
भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही,त्यासाठी इथे भारतीय नेत्यांना फार मोठा त्याग करावा लागला.कित्येक क्रातीकारक लढले.शहीद झाले.काहींची नावं इतिहासात नाहीत.काहींची आहेत.पण जे जे या देशासाठी लढले.त्यांच्या प्राणांच्या बलिदानाचा इतिहास भारत देश विसरू शकत जरी नसला तरी आजही काही लोकं त्यांना शिव्या हासडतांना दिसतात.ही या देशाची शोकांतिका आहे.निदान आपण तरी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही करु शकलो नाही.आताही करण्यासारखे असूनही करु शकत नाही.हे सगळं विसरुन त्यांना शिव्या देण्याचं नव्हे तर बदनाम करण्याचं काम नेहमी काही लोकं करीत असतात.
खरं तर नऊ अॉगष्ट हा क्रांती दिन म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.पण असे असले तरी या दिवसासाठी आठ ऑगस्टलाही जास्त महत्व आहे.याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबई मध्ये एक प्रस्ताव पारित केला.त्या प्रस्तावानुसार नऊ ऑगस्टपासून आपण चलेजाव भारत छोडोचं आंदोलन करु असं ठरलं.प्रत्येक नेत्यांनी रस्त्यावर उतरुन अहिंसक मार्गाने स्वातंत्र्याचा उठाव करु असं ठरलं.त्याला कारणंही तसंच होतं.
१९३९ ला द्वितीय महायुद्ध सुरु झालं.त्या महायुद्धात जर्मन फौजांनी इग्लंडवर सरशी केली.त्यावेळी येथील भारतीय नेत्यांना इंग्रजांनी म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला मदत करा.बदल्यात आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देवू.पण ज्यावेळी युद्ध संपलं,तेव्हा त्या इंग्रजांनी भारतीयांना दगा देत त्या स्वातंत्र्य देण्यापासून माघार घेतली.त्यामुळं पर्यायानं भारतीय नेत्यांची मनं नाराज झाली.म्हणून त्यांनी चलेजावचा उठाव करण्याचं ठरवलं.
या संदर्भात आठ अॉगष्टला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक होण्यापुर्वी त्याच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक चार अॉगष्टला झाली.आपल्याला इंग्रजांनी धोका दिला या विषयावर ती बैठक होती.आपण अहिंसक मार्गानं उद्या रस्त्यावर उतरु हेही विषय होते.परंतू याला बैठकीतील काही लोकांची सहमती झाली नाही.त्यातच काँग्रेसचे जेष्ठ नेते सी राजगोपालाचारी यांनी याच विषयाच्या संदर्भात पार्टी सोडली.त्यामुळं चार अॉगष्टला झालेली बैठक निष्फळ झाली.त्यामुळं त्याच्याच चार दिवसानं म्हणजे आठ अॉगष्टला परत बैठक भरली.तिही याच विषयावर.
या बैठकीतही हाच विषय होता.पण याही बैठकीत हिंदू महासभा,मुस्लिम लीग व भारतीय कम्युनिस्ट पक्षीने विरोध केला.त्यांचं म्हणणं होतं की अहिंसक मार्गानं जरी आपण आंदोलन करीत असलो तरी इंग्रज आपल्याला सोडणार नाहीत.ते आंदोलन दडपवून टाकण्यासाठी बळाचा वापर करतील गोळ्या झाडतील.मग त्यात कित्येक भारतीय लोकं मरतीय.म्हणून हो आंदोलन नको.पण आंदोलन जर केलं गेलं नाही तर या देशातून इंग्रज कधीच जाणार नाही असं तत्कालीन भारतीय नेत्यांना वाटत असल्यानं त्यांनी काही संघटनांचा विरोध होवूनही आंदोलन छेडलं.आठ अॉगष्टला प्रस्ताव पारित झाला व नऊ अॉगष्टला आंदोलनाला सुरुवात झाली.
हे आंदोलन भारतीयांसाठी नवं नव्हतं.यापुर्वीही दहा मे १८५७ ला देशात असंच आंदोलन झालं होतं.तो १८५७ चा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिद्ध आहे.यात बहादूरशहा जफर,नानासाहेब,राणी लक्ष्मीबाई,झलकारीबाई,व तात्या टोपे यांचे विशेष योगदान आहे.तो इतिहास येथील भारतीयांना माहित होता.तसेच तंट्या भील उर्फ भीमा नायक,चंद्रशेखर आझाद,भगतसिंह,राजगूरू,सुखदेव यांना देश विसरला नव्हता.त्यांनी केलेलं प्राणांच बलिदान येथील भारतीयांच्या रक्तात होता.याच बलिदानाचा इतिहास आळवू आळवू देश गांधीजींच्या नेतृत्वात एकत्र झाला होता.मग कित्येक नेते लढले.नेत्यांची धरपकड होताच साता-यात नाना पाटील,नागपूरमध्ये मगनलाल बागडी,सेलोकर गुरुजी यांनी मोर्चा सांभाळला.तसेच यामध्ये बरीच मंडळी शहीदही झाली. तसेच चिमूरमध्येही बरीच मंडळी शहीद झाली.
१८५७ ते १९४२ पर्यंतचा इतिहास रक्तरंजितच होता.कित्येक भारतीय अहिंसक मार्गानं जरी इंग्रजांचा विरोध करीत असले तरी ते गोळ्या झाडत असत.सायमन कमीशनमध्ये लाला लजपतराय यांनी सायमन गो बैक म्हणत मिळवणूक काढताच त्यांना लाठीमार करुन घायाळ केलं होतं,त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जालियनवाला बागेतही तेच घडलं.म्हणून आठ अॉगष्टला झालेल्या बैठकीत प्रस्ताव पारित झाल्यानंतर करो या मरो असा आदेश देत नेत्यांनी चलेजाव भारत छोड़ो चं आंदोलन छेडलं.ही भारतीयांची इंग्रजांना एक चपराकच होती.
प्रस्ताव पारित होताच व उद्या आंदोलन छेडणार आहे हे माहित होताच इंग्रजांनी येथील भारतीय नेत्यांना कैद केलं.महात्माजींना पुण्याला आगाखान पैलेसमध्ये ठेवलं.नेहरू तसेच इतर नेत्यांनाही पकडून देशातल्या वेगवेगळ्या तुरुंगात ठेवलं.तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की आता प्रत्येकजण नेता आहे.इंग्रजांना घाबरु नका.प्रतिकार करा.स्वतःला स्वतःचा नेता समजा.
शेवटी नऊ अॉगष्टपासून सुरु झालेल्या अहिंसक आंदोलनाला पांगविण्यासाठी इंग्रज सैनिकांनी निरपराध भारतीयांवर जालियनवाला बागेसारखा गोळीबार केला.त्यात निरपराध माणसे मरण पावली.कित्येक आंदोलन करणारी आणि न करणारीही.त्यामुळं चिडून जावून येथील भारतीय लोकांनी टेलिफोनच्या तारा तोडल्या.कित्येक पोलिसठाणे जाळले.सरकारी इमारती जाळल्या.कित्येक लोकं भुमीगत झाले. यात कित्येक विद्यार्थीही शहीद झाले.
जेव्हा ही घटनेची माहिती महात्मा गांधींना झाली.त्यांनी तुरुंगातच एकवीस दिवसाचं उपोषण केलं.त्यातच त्यांचं स्वास्थ बिघडलं.त्यातच ते मरण पावतील व पुन्हा देशात रोष वाढेल याचा विचार करुन इंग्रजांनी त्यांना १९४४ मध्ये तुरुंगातून सोडले.
आंदोलन यशस्वी झाले नाही.मग काय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला हिंदू महासभा,वामपंथी दल व मुस्लिम लीग नावे ठेवू लागली.पण महत्वाचं सांगायचं झाल्यास १९४२ चं आंदोलन यशस्वी जरी झालं नसलं ,१८५७ सारखं……..तरी त्या झालेल्या आंदोलनातून इंग्रजांना एक शिक मिळाली.ती म्हणजे आता या देशातून गेल्याशिवाय उपाय नाही.त्यांनी त्यानंतर वेगवेगळ्या बैठका घेतल्या.ज्यांनी या आंदोलनाला मदत केली नाही.त्यांनाही विचारणा करुन शेवटी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निश्चय केला.त्यात काही अटीही टाकल्या.
बहुतेक आजही कोहीनूर भारताचा हिरा इंग्लंडमध्ये आहे.शंकुतला एक्सप्रेसचे पैसे आजपर्यंत इंग्लंडला जात होते.कदाचित अशाच तर अटी नव्हत्या इंग्रजांच्या की त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिलं. या देशात हिंदू मुस्लिम भांडणं नसतांना इंग्रजांनी दोघांच्याही धर्म भावना भडकवून ज्या चाली चालल्यात.त्या चालीतून भारत पाकिस्तान बनला.तसेच अजूनही हा भारत पाकिस्तान वाद भारतात धुमसतच आहे.काल काश्मीर वाद होता.आज सीमावाद आहे.अन् आम्ही भारतीय कालही आपापसात लढत होतो.मी हिंदू मी मुस्लिम म्हणत.आजही लढतो.कोणत्याही देशात वाईट गोष्टी घडल्याच तर त्या ते ते धर्मीय मंडळी त्या त्या धर्मांनीच केल्या असे भांडतो नव्हे तर या देशाच्या एकात्मत्तेला तोडण्याचे काम करतो.
एवढंच नाही तर या देशातील शांतता भंग करतो.नेत्यांच्या आश्नासनात फसतो.नेत्यांबरोबर आपणही आपल्या महापुरुषांना शिव्या द्यायला लागतो.पण याचा विचार करीत नाही की त्या नेत्यांनी त्या काळात जे काही कार्य केले,ते अतुलनीय होते.ते नसते तर देश स्वातंत्र्यही झाला नसता.आपण गुलाम असतो इंग्रजांचे आणि आपली पिढीही गुलाम राहिली असती.देशाला स्नातंत्र्य कधीच मिळालं नसतं आजही.कारण कालच्या नेत्यात जी लढण्याची ताकद आहे.ती आजच्या नेत्यात दिसत नाही.हे नेते फक्त आश्वासन देवू शकतात.शिव्या हासडू शकतात.
– अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
