Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी तहसील समोर कार्तिकेय कोल वॉशरीज कामगारांचे बेमुदत आमरण उपोषण
  • वणी

वणी तहसील समोर कार्तिकेय कोल वॉशरीज कामगारांचे बेमुदत आमरण उपोषण

NewWaniDiary 08/08/2025

▪️संजय खाडे यांचा आंदोलनाला पाठिंबा..

वणी, दि. ७ ऑगस्ट – वणी तालुक्यातील कळमना (खु) येथील कार्तिकेय कोल वॉशरीज प्रा. लि. कंपनीतील कामगार १८ दिवसांचे काम व वेतन न मिळाल्याने तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. कामगारांच्या मागण्या रास्त असून, कंपनीकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर आज संजय खाडे यांनी सहकाऱ्यांसह उपोषण मंडपाला भेट देऊन कामगारांशी चर्चा केली. त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवित सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी कामगारांच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

कामगारांनी तातडीने वेतन व काम देण्याची मागणी केली असून, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगितले.

Continue Reading

Previous: उकणी खाणी क्षेत्रातील रस्ता व शालेय बस समस्यांबाबत संजय खाडे यांची तातडीची मागणी!
Next: ऑगष्ट क्रांती दिनाच्या निमित्याने; आगस्ट क्रांती दिन चिरायू होवो!

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.