Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथील; छोरिया लेआउटमध्ये व्यावसायिकाच्या घरावर अवैध ताब्याचा प्रयत्न
  • वणी

वणी येथील; छोरिया लेआउटमध्ये व्यावसायिकाच्या घरावर अवैध ताब्याचा प्रयत्न

NewWaniDiary 10/08/2025

▪️खंडणी मागणाऱ्यावर राज्य पातळीवरील कारवाईची तयारी..

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक विजयकुमार पारसमल चोरडिया यांच्या मालकीचे मौजा गणेशपूर येथील छोरिया लेआउटमधील घरावर समीर परवेज रफीक रंगरेज, त्याचा साळा व इतर दोघांनी मिळून अवैधरित्या ताबा घेण्याचा प्रयत्न केला. ताबा सोडण्यासाठी त्यांनी चोरडिया यांच्याकडे ३ लाख ५० हजार रुपयांची खंडणी मागितली.

अचानक घडलेल्या या प्रकारानंतर चोरडिया यांनी तात्काळ वणी पोलिस स्टेशनला धाव घेऊन अवैध प्रवेश व खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. समीर रंगरेज याच्या भूतकाळातील गुन्हेगारी इतिहासानुसार, ताबा घेणे, मालमत्ता बळकावणे व खंडणी मागणे हा त्याचा मुख्य धंदा असून, यापूर्वीही त्याच्यावर वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

चोरडिया आपल्या सहकाऱ्यांसह घरात प्रवेश करण्यासाठी गेले असता, रंगरेज याने पत्नी व साळ्याच्या पत्नीला पुढे करून अडवण्याचा प्रयत्न केला तसेच महिलांच्या माध्यमातून फसविण्याची धमकी दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्वांना पोलिस स्टेशनला आणले. अखेरीस दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला असून, रंगरेज याने माफी मागून भविष्यात असे कृत्य न करण्याचे आश्वासन दिले व घराच्या चाव्या चोरडिया यांच्या ताब्यात दिल्या.

दि. १० ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत बोलताना विजय चोरडिया यांनी सांगितले की, माझ्यासारख्या प्रतिष्ठीत व्यावसायिकाच्या घरावर जर गुंड प्रवृत्तीने ताबा होत असेल, तर सर्वसामान्य जनतेसोबत काय घडत असेल, याची कल्पना करावी. या प्रकरणी मोठ्या कारवाईकरिता राज्य पातळीवरील कारवाई केली जाईल.

Continue Reading

Previous: जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन निमित्ताने माकपचे जनआक्रोश रॅली व मेळावा संपन्न
Next: वणी पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधन व वृक्षबंधन सोहळा उत्साहात

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.