
वणी (प्रतिनिधी) – श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ॲड. कुणाल विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली १५ ऑगस्ट रोजी शासकीय मैदानावर सुप्रसिद्ध गायक व इंडियन आयडॉल विजेता हेमंत बृजवासी यांच्या भजन संध्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात राधे राधे, विठ्ठल विठ्ठल, काली कमली मेरा यार है, अकड बंबबम भोले, खाटू वाले, लगन लागी तुमसे मन की लगन यांसारखी अनेक भजने सादर करण्यात आली. समारोप गोविंदा आला रे आला आणि हरे रामा हरे कृष्णा या भजनांनी झाला.
शासकीय मैदानावर कृष्णभक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीने विशेष परिश्रम घेतले.
