Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • राजुर
  • राजुर कॉलरी येथे भगतसिंग जयंती साजरी
  • राजुर

राजुर कॉलरी येथे भगतसिंग जयंती साजरी

NewWaniDiary 28/09/2025


राजुर कॉलरी : वयाचा २३ व्या वर्षी हसत हसत फासावर जाणाऱ्या शहीद ए आजम भगतसिंग यांच्या ११८ व्या जयंती निमित्त दिनांक २८ सप्टेंबर रोजी राजूर येथे राजूर विकास संघर्ष समितीचे वतीने त्यांचा विचारांना व कृतींना उजाळा देत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम येथील विशाल लभाने व अजय भुसारी यांचे हस्ते शहीद भगतसिंग चौकातील शहीद ए आजम भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच गावातील तरुण मुलांचे व गावकऱ्यांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर माकपचे कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, जिजाई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक जयंत कोयरे, अजय भुसारी, अर्जनवीस विजय तोतडे, वैभव मजगवळी यांनी शहीद भगतसिंग यांच्या विचारांना व त्यांनी केलेल्या संघर्षमय कृतींना उजाळा देत आजचा परिस्थितीत त्यांचे विचार आणि कृती किती महत्वाची आहे आणि त्या विचारांना घेऊन गावाचा तसेच देशाचा विकास करण्यासाठी किती समर्पक आहे हे समजावून सांगितले.
त्यानंतर “शहीद भगतसिंग जिंदाबाद, शहीद भगतसिंग अमर रहे, इंकलाब जिंदाबाद”, अशी प्रचंड नारेबाजी करण्यात आली. यावेळेस अमित करमरकर, सुनील सातपुते, इरफान पत्रकार व अन्य अनेक गावकरी व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

Continue Reading

Previous: शिव महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनंत मांडवकर यांची निवड
Next: आजच्या आधुनिक जीवनशैलीत हृदयविकाराचा वाढता धोका

Related Stories

SAVE_20250518_133643
  • राजुर

कुणी सांगितले म्हणून नाही तर स्वतः प्रेरित व्हा – प्रा. वैभव ठाकरे

NewWaniDiary 18/05/2025
SAVE_20250504_175554
  • राजुर
  • चळवळ

डॉ. बाबासाहेबांनी चिन्हीत केलेल्या शत्रूकडे दुर्लक्ष केल्यानेच आजची दैन्यावस्था – अरुण भेलके

NewWaniDiary 04/05/2025
SAVE_20250502_223537
  • राजुर
  • चळवळ

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त राजूर येथे प्रबोधन कार्यशाळा..

NewWaniDiary 02/05/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.