Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • शिव महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनंत मांडवकर यांची निवड
  • वणी

शिव महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनंत मांडवकर यांची निवड

NewWaniDiary 27/09/2025

वणी : बळीराजा व्याख्यानमालेची आयोजक संस्था शिव महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मारेगाव येथील आघाडीचे उद्योजक अनंत मांडवकर यांची नुकतीच निवड करण्यात आली.

समितीच्या बैठकीत मावळते अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष प्रा.डॉ.करमसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. चर्चेनंतर समितीचे जेष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकर्ते असलेल्या अनंत मांडवकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

यापूर्वी समितीचे पहिले अध्यक्ष एड. निलेश चौधरी, दुसरे अध्यक्ष डॉ. रमेश सपाट तर तिसरे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी होते. गेल्या चार वर्षांपासून मा. अजाणी यांनी समितीचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले.

अनंत मांडवकर हे बी.ई.(सिव्हिल) असून मारेगाव शहरातील अमन ट्रेडर्स या प्रतिष्ठानचे ते संचालक आहेत. तसेच ते मराठा सेवा संघाच्या अमरावती विभागाचे उपाध्यक्ष असून विविध पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान राहिले आहे.

या निमित्ताने मावळते अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत समितीशी कायम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर नवीन अध्यक्ष अनंत मांडवकर यांनी आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत बळीराजा व्याख्यानमाला अधिक यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Continue Reading

Previous: वणी पब्लीक स्कुल येथे शिक्षक दिन संपन्न
Next: राजुर कॉलरी येथे भगतसिंग जयंती साजरी

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.