Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • मारेगाव
  • “बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे” — दत्ता डोहे
  • मारेगाव

“बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे” — दत्ता डोहे

NewWaniDiary 16/10/2025

देवाळा (ता. मारेगाव) – “बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे,” या प्रेरणादायी विचारातून समाज प्रबोधनाचे आवाहन करत विचारवंत, लेखक व प्रकाशक दत्ता डोहे यांनी मनुवादी व्यवस्थेवर तीव्र टीका केली.
मारेगाव तालुक्यातील देवाळा गावात आयोजित एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

डोहे म्हणाले, “देशात सध्या मनुवादी विचारसरणीने थैमान घातले असून सत्तेचा गैरवापर करून जाती-धर्माच्या पलीकडील घटकांचे शोषण होत आहे. अगदी देशाच्या मा. सरन्यायाधीशांचा अपमान करण्यापर्यंत ही व्यवस्था पोहोचली आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे समाज प्रबोधन. बुद्ध, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मानवतेचा मार्गच आपल्याला स्वीकारावा.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रशांत पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून डी. एस. खोब्रागडे (नागपूर), राजूभाऊ निमसटकर, डी. डी. गोंदाने (नागपूर) आणि जगदीश भगत (कर सहाय्यक, चंद्रपूर) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भगत यांनी केले, तर समस्त देवाळा ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमातून बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभावी संदेश समाजात पोहोचविण्यात आला.

Continue Reading

Previous: चार वेळा नगरसेवक राहिलेले माजी नगराध्यक्ष रायपुरे पुन्हा निवडणुकीच्या चर्चेत
Next: दिवाळी हा सण सर्वांचाच?

Related Stories

ChatGPT Image Aug 25, 2026, 02_46_13 PM_11zon
  • मारेगाव

मारेगावच्या दोन प्रमुख चौकांत सिग्नल, सीसीटीव्ही व ट्राफिक पोलिसांची मागणी

NewWaniDiary 25/08/2026
ChatGPT Image Aug 14, 2026, 03_51_03 PM_11zon
  • मारेगाव

मारेगाव शहरातील वारंवार वीजखंडितीने नागरिक त्रस्त; सात दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

NewWaniDiary 14/08/2026
SAVE_20250728_212338
  • मारेगाव

मारेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसचे धडाकेबाज अर्धनग्न आंदोलन

NewWaniDiary 28/07/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.