Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • चार वेळा नगरसेवक राहिलेले माजी नगराध्यक्ष रायपुरे पुन्हा निवडणुकीच्या चर्चेत
  • वणी

चार वेळा नगरसेवक राहिलेले माजी नगराध्यक्ष रायपुरे पुन्हा निवडणुकीच्या चर्चेत

NewWaniDiary 16/10/2025

▪️ “दलितांचा ड्रगण लीडर” म्हणून ओळखले जाणारे माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ पुन्हा मैदानात येणार का?

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ (आरक्षित पुरुष) या जागेसाठी माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ जक्कय रायपुरे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्थानिक रा. दामले फैल येथील रायपुरे स्वतः उमेदवारी दाखल करणार की त्यांच्या कुटुंबातील युवा सदस्य मैदानात उतरणार, याबाबत शहरात तसेच जिल्हाभरात चर्चेला ऊत आला आहे.

सन १९८५ पासून राजकारणात सक्रिय असलेल्या रायपुरे यांनी चार वेळा नगरसेवकपद भूषविले असून एक वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनुकंपा वारस हक्क योजना अंतर्गत ३३ जणांना पालिकेत नोकरी मिळवून देण्यात पुढाकार, तसेच वार्डातील सिमेंट रस्ते, शाळा क्र.९, आणि दलित वस्त्यांतील मूलभूत विकासकामे त्यांनी केली. बसस्थानक परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाई आणि शिस्तबद्ध प्रशासनामुळे त्यांची छाप आजही कायम आहे.

दलित वस्तीत राहून साध्या आर्थिक परिस्थितीतून उभे राहिलेल्या रायपुरे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने काम केले. त्यामुळेच त्यांना स्थानिक आणि जिल्हास्तरावर “दलितांचा ड्रगण लीडर” म्हणून ओळखले जाते.

ते श्री हनुमान लाठी आखाड्याचे प्रमुख मार्गदर्शक, श्री शिवाजी आखाड्याचे सदस्य, तसेच सिनियर सिटिझन संघाचे कार्यरत सदस्य आहेत. राजकीयदृष्ट्या ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी संलग्न आहेत.

स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे की, रायपुरे कुटुंबातील कोणी सदस्य आगामी निवडणुकीत उतरल्यास या प्रभागात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये रायपुरे कुटुंबाचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Continue Reading

Previous: वणी शहरात खळबळ : तरुणाचा मृतदेह पाण्यात आढळला
Next: “बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे” — दत्ता डोहे

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.