Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग ५ पुरुष गटामध्ये उमेदवार ॲड. रामेश्वर लोणारे यांचे नावाची जोरदार चर्चा
  • वणी
  • राजकीय

प्रभाग ५ पुरुष गटामध्ये उमेदवार ॲड. रामेश्वर लोणारे यांचे नावाची जोरदार चर्चा

NewWaniDiary 16/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ (SC पुरुष आरक्षित) गटामध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत स्थानिक पातळीवर चर्चा रंगत आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून विविध समाजघटकांतील कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात सक्रिय तरुण तसेच पूर्वी निवडणूक लढवलेल्या काही व्यक्तींना पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती समोर येत आहे.

रा. भीमनगर येथील ॲड. रामेश्वर लोणारे यांचे नावही संभाव्य उमेदवारांमध्ये असून पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रभागात त्यांच्या उमेदवारीबाबत मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही उमेदवारांची नावे निश्चित असताना काहींच्या नावांबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. प्रभागातील निवडणूक वातावरणात दररोज नवनवीन चर्चांना ऊत आल्याचे मतदार सांगत आहेत.

स्थानिकांच्या मते, पुढील काही दिवसांत उमेदवारींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून यंदा मतदार अधिक सजगपणे आपला प्रतिनिधी निवडतील, अशी चिन्हे दिसत आहेत.

Continue Reading

Previous: प्रभाग ५ मध्ये विकासाच्या मुद्यावर मतदारांचे लक्ष; प्रचाराच्या हालचालींना वेग
Next: वणीमध्ये भाजपाची ताकद झळकली; नामांकनासाठी भव्य रॅली

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.