Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग ९ मधून डॉ. अतिक सैय्यद अपक्ष उमेदवार; सामाजिक कार्याचा मजबूत ठसा, मतदारांचे वाढते आकर्षण
  • वणी
  • राजकीय

प्रभाग ९ मधून डॉ. अतिक सैय्यद अपक्ष उमेदवार; सामाजिक कार्याचा मजबूत ठसा, मतदारांचे वाढते आकर्षण

NewWaniDiary 20/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपालिकेच्या प्रभाग ९-ब मधील निवडणुकीत डॉ. सय्यद अतिक इनामुररहीम (रा.प्रभाग ९ , वणी) हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून त्यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या प्रभागात चांगलीच रंगत आहे. या प्रभागात जनता हायस्कूल परिसर, ब्राम्हणी रोड, पंचशील नगर, जैन ले-आऊट, मोमीनपूरा, साई नगरी आदी भागांचा समावेश आहे.

सामाजिक कार्यकर्ता म्हणून डॉ. अतिक सैय्यद यांनी वणी शहरात गेल्या काही वर्षांत भक्कम व सातत्यपूर्ण सामाजिक कार्य केले आहे. कोरोना काळातील अडचणींमध्ये त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन व मदत केली. तसेच वणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात १ जानेवारी २०२१ रोजी प्रथमच आयोजित भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्सव यशस्वी करण्यासाठी त्यांनी द ग्रेट पिपल्स ग्रुपचे प्रमुख सदस्य दिनेश रायपुरे यांच्या सोबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

याशिवाय ते अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिरांचे सातत्यपूर्ण आयोजन करत असून शहरातील विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.

स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे, नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यावर भर देणे, यामुळे डॉ. अतिक सैय्यद हे संवेदनशील, प्रामाणिक आणि उत्तरदायी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानंतर शहरातील विविध प्रभागांतील अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांना समर्थन देण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यांचा प्रचार शहरात वेगाने सुरू असून, मतदारांचा कल मोठ्या प्रमाणात डॉ. अतिक सैय्यद यांच्या बाजूने वळत असल्याचे स्पष्ट चित्र प्रभाग ९-ब मध्ये दिसत आहे.

Continue Reading

Previous: लालपुलिया परिसरात भीषण अपघात; स्कूटीस्वार महिलेचा जागीच मृत्यू
Next: प्रभाग ४ मध्ये नारायण गोडे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा; चौफेरी लढतीची चिन्हे

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.