Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • जैताई नगर–गायकवाड फैलमध्ये आघाडीची सभा रंगली; पेटकर–ढोके ठळक चर्चेत
  • वणी
  • राजकीय

जैताई नगर–गायकवाड फैलमध्ये आघाडीची सभा रंगली; पेटकर–ढोके ठळक चर्चेत

NewWaniDiary 28/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने जैताई नगर व गायकवाड फैल परिसरात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक ४ (SC आरक्षित महिला) मधून मेघा सुधीर पेटकर तसेच प्रभाग ४ पुरुष गटातून प्रवीण शेषराव ढोके यांची नगरसेवक पदासाठी महाविकास आघाडी–शिवसेना (उबाटा) कडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून दोघांनाही ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले आहे.

नगराध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. संचिता विजयराव नगराळे, तसेच प्रभागातील उमेदवार मेघा पेटकर व प्रवीण ढोके यांना या सभेत नागरिकांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कॉर्नर सभेला आमदार संजय देरकर, मनसे नेते राजू उंबरकर, तसेच आघाडीतील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेमुळे प्रभाग क्रमांक ४ मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने जोरदार वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

नागरिकांकडून मिळणारा वाढता विश्वास आणि सर्व स्तरातून मिळत असलेला उत्साह लक्षवेधी ठरत असून, प्रभाग क्रमांक ४ मध्ये महाविकास आघाडीची स्थिती अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.

Continue Reading

Previous: प्रभाग ५ मध्ये विकासाच्या मुद्द्यांवर शिवसेनेची धारदार भूमिका; सभा यशस्वी
Next: वणीत संविधान दिनानिमित्त २९ नोव्हेंबरला व्याख्यान

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.