
वणी (प्रतिनिधी): दामले नगर येथील एका तरुण युवकाचे अचानक जटक्याने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दि. ३ डिसेंबर रोजी करण्यात आला. विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात दामले नगर परिसरात तब्बल सात ते आठ अंत्यविधी पार पडल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.
या दुःखद प्रसंगी दामले नगरचे रहिवासी, दामले नगर मित्र परिवार तसेच वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. ५ मधून नगरसेवक पदासाठी असलेले उमेदवार — दामले नगर, भीम नगर या परिसरातील उमेदवार यांच्यासह कार्यकर्ते — यांनी उपस्थिती दर्शवून कुटुंबीयांना धीर दिला. मात्र, तेली फैलातील काही उमेदवार व माजी नगरसेवकांची अनुपस्थिती स्थानिकांच्या चर्चेचा विषय ठरली.
समाजिक कार्यकर्त्यांकडून असा मुद्दा पुढे आला की, काही इच्छुक उमेदवारांनी तर थेट अंत्यविधीपासून मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. परंतु, शाळा क्र. ९ येथे २ डिसेंबरला मतदान पार पडल्यापासून तेली फैलातील उमेदवार व काही माजी नगरसेवकांनी मात्र अशा कार्यक्रमांना पाठ फिरवली, अशी चर्चा मोक्षधाम परिसरात अनेक मतदारांमध्ये झाली.
काही नागरिकांनी महिला गटातील उमेदवारांबाबत बोलताना—
“मतदानाने पोट भरलं असलं तरी निवडून आल्याच्या भ्रमात राहू नये,”
असा अप्रत्यक्ष टोला लगावला.
दरम्यान, दि. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. “काम संपलं की पाठ फिरवणाऱ्यांना मतदारांची नाराजी भोगावीच लागते,” अशा शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मतदान संपताच वार्डाकडे पाठ फिरवली जाते, अशी चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे.
