Social organizations demand action against those who desecrate the replica of the constitution at Parbhani

दि. १० डिसेंबर २०२४ रोजी सायं.५:३० वा. परभणी येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर संविधानाच्या प्रतिकृतीची दगडफेक करून विटंबना केल्याने या घटनेचा राज्यभर निषेध व्यक्त सुरु आहेत.
याकरिता दि.११ डिसेंबर रोजी, वणी शहरातील समाजबांधवांनी
वणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत: मुख्यमंत्री, देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हे जागतिक नेते असून ते देश व देशाच्या भविष्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेले महामानव आहेत. त्यांचे विचार, कार्य सदैव देशासाठी प्रेरणादायी तसेच सशक्त देशाच्या उभारणीसाठी पाया ठरले आहे. अशा महामानवाच्या पुतळ्यावर दगडफेक करणे म्हणजे वैचारीक दुर्बलांचा देशविरोध दिसून येतो. “Architect of Indian Constitution” डॉ. बाबासाहेबांनी अहोरात्र अथक परिश्रम घेवून भारतीय संविधानाला योग्य दिशा व आकार दिला आहे. अशा राष्ट्रीय ग्रंथाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणे म्हणजे उघड उघड देशविरोधी कृत्य केले आहेत.
वरिल घटना जाणीवपूर्वक करण्यात आली असून फारच निंदणीय व देशविरोधी आहे. “यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट” (YIOAM), समस्त आंबेडकरी अनुयायी, तसेच संपूर्ण समाजातर्फे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केले जात आहे.
सदर आरोपी व त्यामागील सूत्रधाराचा तात्काळ शोध घेवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी. यापुढे महामानव विरोधी व देशविरोधी अशी नीच व निंदणीय घटना घडणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी. निवेदनातून समाज संघटनांनी मागणी केली आहेत.
यावेळी रज्जत सातपुते, काजल वाळके, माजी. नगराध्यक्षा करुणाताई कांबळे,आकाश बोरकर, प्रेम अडकिने, श्वेता माहूर, इस्माईल फिरोज खान,सुरज खैरे, राहुल गोस्की, धमाकचा दाऊंडे, अश्विनी अडकिने,अंकिता पथाडे,आदित्य वाळके, गौरख जवादे, रेखाताई पाटील, चंद्रकलाताई लोहकरे, अंजु वाळके, हेमंत टिपले, सुजल सिडाम, तन्मय वैद्य,चंदन पडवेकर,रविंद्र मेश्राम, रमेश तांबे, प्रशांत गाडगे, पुखराज खैरे, विवेक चंदनकर, कुमार कुमरे,सुशिल अडकिने,साईराम ठाकरे,प्रिती मरकवाडे इत्यादी आंबेडकरी अनुयायी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
