Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी ते छत्रपती संभाजीनगर व हैदराबाद बस सुरू करण्याची मागणी
  • वणी

वणी ते छत्रपती संभाजीनगर व हैदराबाद बस सुरू करण्याची मागणी

NewWaniDiary 17/02/2026

▪️ मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे आगार व्यवस्थापकांना निवेदन..

वणी (प्रतिनिधी) : वणी शहर हे औद्योगिक क्षेत्र म्हणून परिचित असून शहरासह ग्रामीण भागातील अनेक प्रवासी शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच वैद्यकीय कारणांसाठी छत्रपती संभाजीनगर व हैदराबाद येथे नियमित प्रवास करतात. मात्र वणी येथून या दोन्ही शहरांकडे जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर वणी ते छत्रपती संभाजीनगर तसेच वणी ते हैदराबाद अशी थेट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी जनतेच्या वतीने मानवी हक्क सुरक्षा परिषद तर्फे करण्यात आली आहे. दिनांक १७ फेब्रुवारी रोजी वणी आगारप्रमुख विवेक बन्सोड यांना देण्यात आलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली.

निवेदन देतेवेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख परशुराम पोटे, महिला जिल्हा संपर्कप्रमुख सौ. सुमित्रा नारायण गोडे, वणी विधानसभा अध्यक्ष बी. आसुटकर, वणी शहर महिला अध्यक्ष सौ. प्रमिला चौधरी, सौ मनिष सुरेंद्र निब्रड, यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्ष, संजय चिंचोलकर, ज्ञानेश्वर बोनगीनवार, सुरेश बन्सोड,वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने , यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बससेवा तातडीने सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Continue Reading

Previous: वणीत पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली
Next: वणी प्रभाग ५ दामले फैलमध्ये अनियमित पाणीपुरवठा; नागरिकांची तीव्र नाराजी

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.