Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026

वणी (प्रतिनिधी): वणी शहराजवळील निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट लांबीचे कठडे तुटल्याने तसेच पुलालगत काही ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा मार्ग मुकुटबन तसेच तेलंगणा राज्याला जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने येथे दिवसभर अवजड व हलक्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच मार्गावरून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पालक दुचाकीने नियमित ये-जा करतात. पुलालगत असलेल्या गणेशपूर परिसरातील छोरिया लेआउटसह अनेक निवासी वसाहतींतील नागरिक याच मार्गाचा वापर करतात. मात्र नदी पुलावरील तुटलेले कठडे आणि रस्त्यावरील मोठे खड्डे यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

यापूर्वीही या पुलावर ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली असून, अवजड वाहनांचे संतुलन बिघडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम काही ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सा.बा.) अधिकाऱ्यांनी या धोकादायक परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन पुलावरील तुटलेल्या कठड्यांची दुरुस्ती करावी. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरूम, गिट्टी आदी साहित्य टाकून तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोठी जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पुलाची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Continue Reading

Previous: उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही
Next: अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा अपघातग्रस्त कुटुंबाला आर्थिक व शैक्षणिक आधार

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.