Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी
  • सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडायला हवं?
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी

सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडायला हवं?

NewWaniDiary 16/07/2026

सध्याचं जग गाढवासमोर वाचली गीता यासारखं आहे. कोणी कोणाचं ऐकतच नाही व कोणाला कोणाचं ऐकून घ्यायलाही अजिबात वेळ नाही. सध्या होत असलेलं सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण. ज्या उपोषणाचा मुख्य मुद्दाच धर्मेश प्रधानचा राजीनामा आहे. नीट पेपर फुटतांना भ्रष्टाचार झाला. हे कॉक्रोज जनता पार्टीचं म्हणणं. ज्याला उपोषणानं सोनम वांगचूक यांनी समर्थन दिलं. ज्यात धर्मेश प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा. असं देशातील एकंदर जनतेचं म्हणणं. तेच अभिजीत दिपके व सोनम वांगचूक यांचंही म्हणणं. परंतु धर्मेश प्रधान समोर कदाचीत सोनम वांगचूकचं उपोषण चिल्लर असावं असं वाटतं. तसंच अभिजीत दिपकेचंही आंदोलन चिल्लर वाटत असावं. म्हणूनच एकोणवीस दिवसाचं उपोषण झालं व सोनम वांगचूक मरायलाही टेकले तरी सरकारतर्फे कोणतंच पाऊल पडतांना दिसत नाही. त्यावरुन असं दिसतं की कदाचीत विद्यमान सरकार धर्मेश प्रधानसह सोनम वांगचूकच्या मरणाचीच वाट पाहात आहे की काय? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. अन् असं घडलंच तर अजून एक आत्महत्या होणार की काय, सरकारच्या वागणुकीमुळे. असेही बोल जनता बोलू लागली आहे. तसंच सोनम वांगचूक ही देशाची अत्यावश्यक गरज आहे. त्यांनी उपोषण सोडायला हवं. असंही जनता म्हणत आहे. कारण जास्त दिवस उपोषणानं मृत्यूही येवू शकतो. विपरीत घडू शकतं आणि विपरीत जर घडलंच तर लोकांचा सरकारवरील विश्वास नक्कीच उठू शकतो व जनता संधी मिळताच नेपाळसारखी क्रांतीही करु शकतात. तेव्हा धर्मेश प्रधानच नाही तर जनता खुद्द मोदी साहेबांचाही राजीनामा मागू शकतात. हे तेवढंच खरं. एका सरकारनं कोणत्याही विपरीत परिस्थितीत अतिशय अक्कलहुशारीने, संवादानं, आलेलं संकट वा त्यावर सामोपचारानं मार्ग काढायला हवा. कारण देशातील प्रत्येक नागरीक हा देशासाठी महत्वाचा आहे. परंतु सरकार निव्वळ चूप आहे व मौन बाळगून आहे. याचाच अर्थ असा तर नाही की सरकारला देशातील जनतेशी काहीही घेणंदेणं नाही. कदाचित सोनम वांगचूक यांनीच उपोषण धरुन चूक केली. ते उपोषण सोडायला हवं. असं तर सरकारचं म्हणणं नसावं.*
देशातील जंतरमंतरवर होत असलेलं आंदोलन. ते आंदोलन अभिजीत दिपकेच्या माध्यमातून होत आहे व त्या आंदोलनात सोनम वांगचूक यांनी आमरण उपोषण नावाचं हत्यार उपसलं आहे.
आमरण उपोषण…….. आतापर्यंत तसं पाहिल्यास बऱ्याच लोकांनी उपोषण केलं. परंतु काहींचं कमी दिवसाचं झालं. ते विचारात घेतलं जात नाही. आमरण उपोषणाचं हत्यारात सर्वात प्रथम महात्मा गांधींचं नाव येतं. कारण त्यांचे उपोषणाचे दिवस जास्त म्हणजे एकवीस होते व ते मरतीलच असं वाटत असल्यानं ब्रिटिश शासनानं लगेच स्वातंत्र्य देण्याचं बहाल केलं.
उपोषणाचं पहिलं हत्यार सर्वात पुर्वी महात्मा गांधी यांनी उभारलं होतं. ते इंग्रजांच्या विरोधात होतं. ज्यात महात्मा गांधींनी एकवीस दिवस उपोषण केलं होतं. ज्यातून भारताला स्वातंत्र्य देण्याचं इंग्रजांनी कबूल केलं व भारताला स्वातंत्र्य मिळालं. कारण आमरण उपोषणानंतर समजा तो व्यक्ती मरण पावलाच तर त्याचा परिणाम थेट जनतेच्या मतावर होवू शकतो. जनता सत्ताधिकाऱ्यांना साम, दाम, दंड भेद या सर्वच हत्यारांनी नेस्तनाबूत करु शकते. हा इंग्रजांचा विचार होता.
दुसरा आमरण उपोषण महात्मा गांधीनंतर अण्णा हजारे यांच्या नावावर आहे. त्यांनीही आमरण उपोषण केलं होतं. मागणी होती, कॉंग्रेस सरकारनं लोकपाल आणावं. ज्यात ते उपोषण तेरा दिवसाचं झालं व तद्नंतर लोकपाल आणण्याचं वचन देणारं भाजपा सरकार पुढील काळात निवडून आलं. परंतु लोकपाल आलं नाही. त्यानंतर तिसरं उपोषण हे सतरा दिवसाचं मनोज जरांगे पाटलानं केलं. मुद्दा होता, मराठ्यांना आरक्षण मिळावं. तद्नंतर मागणी मान्य झाली व मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि उपोषण सुटलं. आता सोनम वांगचूक हे आमरण उपोषण करीत आहेत व आज लेख लिहितेवेळेस त्यांच्या उपोषणाला एकोणवीस दिवस झाले आहेत. मागणी आहे, देशाचे शिक्षणमंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. का? तर तर नीट परिक्षा रद्द झाली व ती रद्द झाल्यानं त्यातून निराश झालेल्या, परीक्षा देणाऱ्या बऱ्याच मुलामुलींनी आत्महत्या केली. ज्याला जबाबदार आहेत शिक्षणमंत्री.
शिक्षणमंत्री जबाबदार? होय. कारण देशात पेपर फुटतोच कसा? सर्व देशातील नागरीकांचा प्रश्न. तोच प्रश्न जनतेसमोरही. नीटचा पेपर फुटला. कारण व्यवस्था. पेपर यंत्रणा राबविणारी व्यवस्था ही पारदर्शक असायला हवी. परंतु ती नाही. का नाही? कारण जी व्यवस्था पेपर लीक करते. अन् आतापर्यंत लीक झालाय. त्या व्यवस्थेवर वा व्यवस्थेविरोधात जबरदस्त कारवाई झाली नाही. म्हणूनच हिंमत वाढली व पेपर लीक झाला. खरं तर त्या व्यवस्थेवर शिकंजे कसण्याचं काम धर्मेश प्रधानचं होतं. कारण ते शिक्षणमंत्री आहेत व ते शिकंजे तेच कसू शकत होते. ज्यातून पेपर लीक होवू शकत नव्हता. त्यातच कोणीच आत्महत्या करु शकले नसते.
नीटमध्ये ज्या ज्या मुलांनी आत्महत्या केल्या, निराश होवून. अभिजीत दिपकेचं म्हणणं आहे की ते ज्या कुटुंबात जन्मले. त्या त्या कुटुंबांची हानी झाली. त्यामुळंच साहजीकच कुटुंबांना मुआवजा देणं. ही सरकारची जबाबदारी आहे. कारण सरकारमुळंच ते घडलं. त्यासाठीच जंतरमंतरवर आंदोलन आणि उपोषणही. ज्यात शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक त्या आंदोलनात सक्रीयतेनं सहभागी होवून मागण्या पुर्ण होत नाहीत. तेव्हापर्यंत आपलं उपोषण करीत आहेत. एका व्यवस्थेच्या विरुद्ध. ज्या व्यवस्थेमुळं बिचाऱ्या नीट पेपरच्या परिक्षेला बसलेल्या लोकांचा जीव गेला.
कोण आहेत हे सोनम वांगचूक? सोनम वांगचूक आहे लडाखचं अतिशय इमानदार व्यक्तीमत्व. ज्यांना लडाखमध्ये राहात असतांना शिकता येवू शकलं नाही. कारण तिथं अतिशय मोठ्या प्रमाणावर बर्फ पडत असून तिथू गतकाळात म्हणजेच सोनम वांगचूकच्या जन्माचे वेळेस शाळा नव्हती. त्यांचे वडील हे राजनीतीमध्ये होते व ते निवडून आल्यानंतर श्रीनगरसारख्या ठिकाणी राहायला गेले व तिथंच सोनम वांगचूकच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. परंतु तरीही शाळेतील बोलीभाषेबाबत भेदभाव असलेले वातावरण सहन न झाल्यानं सोनम वांगचूक हे दिल्लीला पळून आले व त्यांनी दिल्लीत आपलं संपुर्ण शिक्षण पुर्ण केलं. पुढं त्यांनी लडाखमध्ये शिक्षणाच्या सोयी नसल्यानं तिथंच शाळा काढण्याचा व तेथील मुलांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी थंडीवर मात करणारी शाळा उभारली. ज्या शाळेच्या भींती मातीच्या आहेत. ज्यातील तापमान कडाक्याच्या थंडीतही उबदार असतं. तसंच त्यांनी उन्हाळ्यात होणारा पाण्याचा त्रास पाहून बर्फाच्छादित स्तुपाची योजना आणली की जे डर्फ उन्हाळ्यात थोडं थोडं पिघलेल व सर्वांना उन्हाळ्यात देखील पाणी मिळेल.
सोनम वांगचूक यांनी फार मोठं काम केलं. ते देशाची गरज आहेत नव्हे तर महान असं रत्न. त्यांनी मोलाचं कार्य केलं. कोणासाठी? तर विद्यार्थ्यांसाठी. तळागाळातील विद्यार्थी शिकायला हवा. त्यानं उच्चशिक्षण घ्यायला हवं. यासाठी सोनम वांगचूक पुढे सरसावतात. त्यांचं हेच एकंदरीत कार्य पाहून त्यांना बरेच पुरस्कार मिळाले आहेत. ज्यान रमन मॅगसेसे या पुरस्काराचाही समावेश होतो.
सोनम वांगचूक हे देशाचे अनमोल रत्न आहेत की जे भाजपाच्या विरोधात उपोषणाला बसले. ते कॉक्रोज जनता पार्टी या अभिजीत दिपकेच्या पार्टीच्या बाजूने उभे आहेत. त्यातच देशाचे मंत्री असलेले धर्मेश प्रधान हे मंत्री जरी असले तरी सोनम वांगचूकच्या मानाने पाहिजे तेवढे रत्न नाहीत. त्यातच देशात शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. सध्या नीटचा पेपर तर फुटलाच. शिवाय टि ई टी चा पेपर देखील फुटलेला आहे. एवढंच नाही तर देशात सर्व शिक्षकांनी टि ई टी द्यायला हवी. असा फतवा न्यायालयानं काढलेला आहे संबंध प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत. ज्या निर्णयावर भाजपा बोलायला खाली नाही. एवढंच नाही तर भाजपा इतर बर्‍याच गोष्टींवर संवाद साधत आहे. परंतु मुख्य मुद्द्यावर कोणीच बोलत नाहीत वा बोलायला खाली नाही. याला चिल्लर समजणं असंही म्हटलं तर आतिशयोक्ती होणार नाही. असं जनतेचं म्हणणं.
लोकं असंही म्हणतात की सोनम वांगचूकजी, आपण उपोषण सोडायला हवं. कुणासमोर उपोषण करीत आहात? ज्यांना भावनाच नाहीत. ज्यांना दया, माया नाही. जे मरणाची वाट पाहात बसले आहेत. ज्यांच्या भावनाच मेलेल्या आहेत. ते आपण मरण पावलात तरी रडणार नाहीत. शोकंही व्यक्त करणार नाहीत. आपण महान आहात. थोर आहात. भावनाशील आहात. म्हणूनच आपणाला विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सहन झाल्या नाहीत. आपण त्यासाठी लढा पुकारलाय. उपोषण करताय. परंतु मार्ग चुकीचा निवडलाय. अहो, जनावरांनाही दया येते एखाद्या पाडसांची. तेही दया घेवून पाडसांना सोडून देतात. परंतु विद्यमान सरकार, त्यालायक नाहीच. ते भावनाहीन सरकार आहे. हे आधी समजून घ्या. तुमचं उपोषण म्हणजे गाढवासमोर वाचली गीता. यासारखं आहे.
सध्याचं होत असलेलं सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण. ज्या उपोषणाचा मुख्य मुद्दाच धर्मेश प्रधानचा राजीनामा आहे. नीट पेपर फुटतांना भ्रष्टाचार झाला. हे कॉक्रोज जनता पार्टीचं म्हणणं. ज्याला उपोषणानं सोनम वांगचूक यांनी समर्थन दिलं. ज्यात धर्मेश प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा. असं देशातील एकंदर जनतेचं म्हणणं. परंतु धर्मेश प्रधान समोर कदाचीत सोनम वांगचूकचं उपोषण चिल्लर असावं असं वाटतं. एकंदर सत्तेत असलेल्या भाजपाई सरकारलाही तेच वाटत असेल असंही दिसतं. म्हणूनच सरकारतर्फे एकोणवीस दिवसाचं उपोषण झालं व सोनम वांगचूक मरायलाही टेकले तरी कोणतंच पाऊल पडतांना दिसत नाही. त्यावरुन असं दिसतं की कदाचीत विद्यमान सरकार सोनम वांगचूकच्या मरणाचीच वाट पाहात आहे की काय? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. अन् असं घडलंच तर अजून एक आत्महत्या होणार की काय, सरकारच्या वागणुकीमुळे. असेही बोल जनता बोलू शकते. मात्र विपरीत जर घडलंच तर लोकांचा सरकारवरील विश्वास नक्कीच उठू शकतो व जनता संधी मिळताच नेपाळसारखी क्रांतीही करु शकतात. तेव्हा धर्मेश प्रधानच नाही तर जनता खुद्द मोदी साहेबांचाही राजीनामा मागू शकतात. हे तेवढंच खरं. एका सरकारनं कोणत्याही विपरीत परिस्थितीत अतिशय अक्कलहुशारीने, संवादानं, आलेलं संकट वा त्यावर सामोपचारानं मार्ग काढायला हवा. कारण देशातील प्रत्येक नागरीक हा देशासाठी महत्वाचा आहे. परंतु सरकार निव्वळ चूप आहे व मौन बाळगून आहे. याचाच अर्थ असा की सरकारला देशातील जनतेशी काहीही घेणंदेणं नाही.
महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासाठी आहे की सध्या देशात बऱ्याच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या आहेत. लोकंही काहीबाही बोलायला लागले आहेत. तसे पाहिल्यास लोकं राजालाही नावबोटं ठेवतातच. परंतु हे जरी खरं असलं तरी शैक्षणिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. टि ई टी चा मुद्दाही देशात गाजत आहे. त्यातच महागाईची झळ सतावते आहे देशाला. पेट्रोल, डिझेल व गॅस वाढतीवर आहे. शिवाय सोनम वांगचूक काही लहानसं व्यक्तीमत्व नाही. तेव्हा सरकारनं या सर्व गोष्टीचा विचार करावा. त्यातच जंतरमंतरवर होत असलेल्या आंदोलनाला भेट द्यावी. अभिजीत दिपके वा सोनम वांगचूकशी बोलणी करावी. त्यातच सामोपचारानं व संवादानं त्यातून मधील मार्ग काढावा. कारण जास्त दिवस झाल्यास प्रकरण चिघडू शकते. ज्यातून देशात अराजकताही माजू शकते. शिवाय अभिजीत दिपके व सोनम वांगचूक हे काही देशाचे आणि विद्यमान सरकारचे शत्रू नाहीत. ते देशाचे नागरिकच आहेत. हे विसरता कामा नये. शक्य तितक्या लवकर आंदोलन संपवावं सोनम वांगचूक यांचं उपोषण सोडवून म्हणजे झालं. कारण सोनम वांगचूक सारखी माणसं देशाची अत्यावश्यक गरज आहे, यात शंका नाही.

– अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Continue Reading

Previous: विकासाच्या नावाखाली वृक्षतोड, जलस्रोतांकडे दुर्लक्ष; वाढत्या उष्णतेने वणीकर चिंतेत
Next: वणीतील वाढती उष्णता : विकास झाला; पण सावली कुठे?

Related Stories

SAVE_20260729_163338
  • पृथ्वीरक्षण
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी

वन्यजीव जगतील तरच मानव जीवन वाचणार

NewWaniDiary 29/07/2026
EWRdN83XYAAYRp1
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी

पुस्तकांची अमूल्य शक्ती ओळखा

NewWaniDiary 23/04/2026
World-Mental-Health-Day-2025-Wishes-Quotes-share-on-whatsapp-instagram-facebook_
  • लेख:समाज जागृती करण्यासाठी

किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या मानसिक आरोग्य समस्येत पालकांची भूमिका

NewWaniDiary 02/03/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.