
वणी (प्रतिनिधी) : मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण जश्ने ईद मिलाद-उन-नबी बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी वणी शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोमीनपुरा येथील मस्जिदसमोर दुपारी २ वाजता आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना ४१ नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले.
आमेर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक जम्मू खान उर्फ जमीर खान यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरणार आहे. नवीन सायकली मिळाल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होणार असून, पालकांनी जम्मू खान यांचे आभार मानले.

सायकल मिळालेल्या विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी
जनता विद्यालय, वणी — १० विद्यार्थी :
१. जयश विजय रोगे — इयत्ता ६ वी, रा. दीपक चौपाटी
२. मंजिरी गणेश पारखी — इयत्ता ६ वी, रा. दीपक चौपाटी
३. इश्वरी विकास मेश्राम — इयत्ता ६ वी, रा. रंगनाथ नगर
४. चैताली अमोल मांढरे — इयत्ता ६ वी, रा. शास्त्री नगर
५. विद्या सतीश पिंपळकर — इयत्ता ६ वी, रा. शास्त्री नगर
६. श्रेया जितू भोयर — इयत्ता ६ वी, रा. गोकुळ नगर
७. तन्वी कामटकर — इयत्ता ६ वी, रा. गायकवाड फैल
८. निलू अविनाश गोहेकार — इयत्ता ५ वी, रा. वणी
९. रमेश जगताप — इयत्ता ७ वी, रा. वणी
१०. यश अतुल गेडाम — इयत्ता ९ वी, रा. वणी
एस.पी.एम. विद्यालय, वणी — १ विद्यार्थी :
११. आरोशी अजय वाढई — इयत्ता ५ वी, रा. दामले फैल
मोमीनपुरा परिसरातील — २० विद्यार्थी :
१२. मोहम्मद साद मोहम्मद एजाज — इयत्ता ५ वी, रा. जामा मस्जिद
१३. नाबिल फरेम शेख — इयत्ता ६ वी, रा. जामा मस्जिद
१४. अशफिया शकील उल्ला — इयत्ता १० वी, रा. मोमीनपुरा
१५. स. रेहान स. राजन — इयत्ता ६ वी, रा. जगलीपीर
१६. निदा जावेद शेख — रा. मोमीनपुरा
१७. सना जमशेर जम्मा शेख — इयत्ता १० वी, रा. मोमीनपुरा
१८. आलिया असलम शेख — इयत्ता ६ वी, रा. गोकुळ नगर
१९. शाहजब इमाम शेख — इयत्ता ६ वी, रा. गोकुळ नगर
२०. सिजा शेख शाकीर शेख — इयत्ता ७ वी, रा. पंचशील चौक
२१. सानिया मिर्झा अमीस बेग — इयत्ता १० वी, रा. शाहमहाराज, मोमीनपुरा
२२. खुशी अहमद सय्यद — इयत्ता १० वी, रा. रामपुरा
२३. सुजन अली निसार अली — इयत्ता ९ वी, रा. पंचशील चौक
२४. वृषभ विशाल उईके — इयत्ता ३ री, रा. मोमीनपुरा
२५. जोया शाबन शाहा — इयत्ता ९ वी, रा. इस्लामपुरा
२६. मोहम्मद अब्दुल गणी — इयत्ता ५ वी, रा. शास्त्री नगर
२७. अरमान ऐशाज शेख — इयत्ता ९ वी, रा. रामपुरा
२८. फैजान शेख — इयत्ता ६ वी, रा. मोमीनपुरा
२९. मारिया फिरोज खान — इयत्ता ७ वी, रा. काजीपुरा
३०. फातिमा आरीफ पठाण — रा. मोमीनपुरा
३१. अबमीरा आझाद खान — रा. फुकटवाळी
विवेकानंद विद्यालय, वणी — १० विद्यार्थी :
३२. प्रगती विनायक वाढई — रा. दिनानाथ नगर, लालगुडा
३३. अभय किशोर भगाडे — रा. गोकुळ
३४. आरती रामकल्याण इंगोले — रा. रामपुरा वार्ड
३५. साईराज सचिन बावणे
३६. अंजली चंद्रशेखर चौधरी — रा. सेवा नगर
३७. आर्या अंकुश गावंडे — रा. सेवा नगर
३८. पूर्वी प्रदीप थेरे — रा. मार्की
३९. वंशिका गजानन पिंपळकर — रा. जैन लेआउट
४०. प्रणय विजय कांबळे — रा. रंगनाथ नगर
४१. सनम अलताफ शेख — रा. शास्त्री नगर

जम्मू खान यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदत केली आहे. त्यांच्या पुढाकारातून ऐतिहासिक मुस्लिम विवाह मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या अशा उपक्रमांमुळे त्यांच्या भवितव्याला नवी दिशा मिळण्यास मदत होते. आमेर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी व सेवाभावाचा सकारात्मक संदेश देणारा ठरला.


