
वणी (प्रतिनिधी) : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने वणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक घटनेमुळे लाखो धम्मबांधवांच्या जीवनात नव्या विचारांचा आणि समतेचा प्रकाश निर्माण झाला. याच ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.
यावेळी मंचचे अध्यक्ष बंडू कांबळे, सचिव विजय नगराळे, उपाध्यक्ष संजय तेलंग, कोषाध्यक्ष रामदास कांबळे, नरेश तेलंग, कवडू जिवणे, करुणा कांबळे, विवेक गाडगे, माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ रायपुरे, रवी कांबळे, विवेक तेलंग, गोवर्धन तेलतुम्बडे, वसंत नगराळे, मनोहर ठमके, पुंडलिक पाथाडे, चंद्रसेन जिवणे, रामभाऊ टिपले, किशोर चहांदे, मिलिंद पाटील, प्रकाश खोब्रागडे, भारत कुंभारे, जुनघरी आणि अनिल थुल यांच्यासह अन्य उपस्थितांनी अभिवादन केले.
