▪️ राष्ट्रपतींकडे निवेदन; प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणी..

वणी (प्रतिनिधी) : दिल्ली येथे झालेल्या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ १६ ऑक्टोबर रोजी वणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर वणी तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे करण्यात आली.

या मोर्चात काँग्रेस नेते संजय खाडे, काँग्रेस कमिटीचे यवतमाळ जिल्हा सचिव डेव्हिड पेटकावार, जय आबड, विकेश पानघाटे टिकाराम कोंगरे, यांच्यासह शंकर वरहाटे, तेजराज बोढे, जगदीश चौधरी, मनोज वाळटी, रामदास कुचनकार, नगरसेविका करुणा कांबळे, ठाकूर, कुंदन पेंदारे, रविंद्र कांबळे, संदीप बोयरा, निखील मडावी आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यू वणी डायरी न्यूज पोर्टल
