Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट च्या वतीने,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त,विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप
  • वणी
  • चळवळ

यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट च्या वतीने,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त,विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप

NewWaniDiary 06/01/2025

३ फेब्रुवारी २०२५ रोजी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मोमेंटच्या वतीने,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळसोनि येथे विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शाळेच्या मुख्याध्यापिका परसावर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पळसोनी ग्रामपंचायत च्या सरपंच नलिनी दुधबळे, उपसरपंच पुखराज खैरे व यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट च्या सदस्य काजल वाळके, प्रेम अडकिने, श्वेता माहुरे, अंकिता पथाडे उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे संचालन गजानन मडई यांनी केले व आभार आकाश खोब्रागडे यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले व काजल वाळके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भर टाकत त्यांचे आपल्यावर असलेले उपकार हे अमोलनिय आहे असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून मांडले व प्रेम अडकिने यांनी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटचे ध्येय काय आहे व महापरिनिर्वाणदिनी मिळालेल्या शालेय उपयोगी वस्तूचे वाटप कशा पद्धतीने होईल यावर विश्लेषण करून आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी आयोजित “एक पेन एक वही” या उपक्रमात आलेल्या शालेयउपयोगी साहित्याचे वाटप शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले.

यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे मार्गदर्शक हेमंत टिपले व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग तसेच यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटचे सर्व पदाधिकारी रज्जत सातपुते, आकाश बोरकर, सुरज खैरे, गौरव जवादे, आदित्य वाळके, अश्विनी अडकिने, ऋचाताई दारुंडे,राहुल घोस्की, इस्माईल खान उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वर्गशिक्षकांनी आपला फीडबॅक दिला व मुख्याध्यापिका परसवार यांनी उपक्रमाचे कौतुक करून लेटर पॅड वर वितरित झालेल्या शालेय उपयोगी वस्तूचे लेखी स्वरुपात शुभेच्छा पत्र दिले.

Continue Reading

Previous: अडेगांव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी…
Next: श्री.छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेला उज्ज्वल भविष्य – डॉ. भालचंद्र चोपणे

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.