Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • श्री.छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेला उज्ज्वल भविष्य – डॉ. भालचंद्र चोपणे
  • वणी

श्री.छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेला उज्ज्वल भविष्य – डॉ. भालचंद्र चोपणे

NewWaniDiary 06/01/2025

वणी – येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी , राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय व छत्रपती शाहू महाराज आय टी आय यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्षिक स्नेहसंमेलन संस्कार २०२५ चे उद्घाटन डॉ. भालचंद्र चोपणे माजी कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेत किशोर गज्जलवार गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी यांच्या हस्ते दि. २ जानेवारी २०२५ रोजी पार पडले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा, संचालक मंडळाचे सदस्य तसेच इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कॉलेज मारेगाव चे प्राचार्य डॉ निलेशजी चचडा, संचालक मंडळाचे सदस्य विक्रांतजी चचडा, राजश्री शाहू महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय पारखी, छत्रपती शाहू महाराज आय टी आय चे प्राचार्य आकाश कांबळे व वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य प्रफुल महारतळे यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शाळांचा वार्षिक अहवाल सादर करीत असतानाच संस्कार हे केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता हे विचारांचे अंतर्मुख करणारे संमेलन असल्याचे प्रतिपादन डॉ. निलेश चचडा यांनी केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटकीय भाषणाद्वारे किशोर गज्जलवार यांनी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनात वार्षिक स्नेसंमेलनाचे अनन्यसाधरण महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र चोपणे यांनी श्री. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचा आजपर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख करीत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखीत गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रदान करण्याकरिता सतत प्रयत्नरत असल्याने या संस्थेला उज्वल भविष्य असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.


संस्कार २०२५ अंतर्गत वक्तृत्व ,गीत गायन, नृत्य,रांगोळी, फुलसजावट,फॅशन शो,पोस्टर मेकिंग ,वेशभूषा विविध रंगारंग कार्यक्रम व विविधक्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेद्वारा दिला जाणारे पुरस्कार स्वर्गीय हंसराज चचडा आर्यभट पुरस्कार कु. आर्या मत्ते, कु. हर्षदा आवारी व स्वरा मुळेवार यांना तसेच स्वर्गीय कल्पना चावला पुरस्कार कु. रूषाली खारकर व हर्षदा आवारी यांना व स्वर्गीय नंदकिशोर चचडा स्मुर्ती पुरस्कार चेतन बोढाले व वैभव आवारी आणि एच एस सी मेरीट अवॉर्ड कु. काजल कोचर या विद्यार्थ्यांना मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन प्रनोती खडसे व तेजस्विनी झाडे यांनी संयुक्तरित्या केले व आभार प्रदर्शन प्रफुल महारतळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना परिश्रम घेतले. प्रदर्शन प्रफुल महारतळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना परिश्रम घेतले.

Continue Reading

Previous: यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट च्या वतीने,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त,विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप
Next: मकरसंक्रांती निमित्य एकमेकींना भेट देण्यासाठी महामानवांची पुस्तके फक्त १० रुपयांत उपलब्ध

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.