Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • नांदेपेरा येथे:समाजसुधारक फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त,विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे साहित्य वाटप..
  • वणी
  • चळवळ

नांदेपेरा येथे:समाजसुधारक फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त,विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे साहित्य वाटप..

NewWaniDiary 10/01/2025
 ९ फेब्रुवारी २०२५ रोजी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,नांदेपेरा येथे:भारतातील पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका आणि समाज सुधारक फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वह्या-पेन्स चे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा मेश्राम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गीतांजली माथणकर (जि.प.प्रा.शाळा, नांदेपेरा), विलास चिकटे (सरपंच,नांदेपेरा), अनिल सोनटक्के  (माजी सरपंच, भूरकी), हरीश पाते (सामाजिक कार्यकर्ते, वणी), राजू चिडे (सामाजिक कार्यकर्ते,नांदेपेरा), प्रदीप मडावी (सामाजिक कार्यकर्ते, वणी) व यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटच्या सदस्या श्वेता माहुरे, आदित्य वाळके उपस्थित होते. 
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटचे सदस्य रज्जत सातपुते यांनी केले व आभार प्रदर्शन आकाश बोरकर यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना समाज सुधारक फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश देत त्यांच्या समाजकार्याची जाणीव करून दिली.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गीतांजली माथनकर यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करून यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट चे सदस्य आदित्य वाळके यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेमध्ये संघटनेचे ध्येय, उद्देशाबद्दल तसेच इतर कार्याबद्दल माहिती दिली.आणि श्वेता माहुरे यांनी भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जीवनावर भर टाकला. शिक्षणाचे महत्व किती  काय आहे याचे उदहारण देतं आपले मनोगत व्यक्त केले. 

यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आयोजित "एक वही - एक पेन" या उपक्रमात आलेल्या वह्या - पेन्स चे वाटप शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतर्फे गीतांजली माथनकर यांनी लिखित फीडबॅक दिला. तसेच मुख्याध्यापिका  प्रज्ञा मेश्राम यांनी उपक्रमाचे कौतुक करून लेटर पॅड वर वितरित झालेल्या वह्या पेन्स बद्दल लेखी स्वरुपात शुभेच्छा पत्र दिले.

यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे मार्गदर्शक हेमंतकुमार टिपले  व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग तसेच यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट चे सर्व सदस्य रज्जत सातपुते, प्रेम अडकीने, आकाश बोरकर, सुरज खैरे, गौरव जवादे, काजल वाळके, श्वेता माहुरे, ऋचा दारुंडे, अंकिता पथाडे, अश्विनी अडकिने,राहुल घोस्की, इस्माईल खान इत्यादी उपस्थित होते.

Continue Reading

Previous: ॲड. कुमार मोहरमपुरी यांची माकपाचा जिल्हा सचिवपदी फेरनिवड
Next: बालकांअगोदर पालकांनी संस्कारांचे महत्त्व समजणे अत्यंत गरजेचे

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.