Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथे:महाआरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी केली तपासणी
  • वणी

वणी येथे:महाआरोग्य शिबिरात असंख्य रुग्णांनी केली तपासणी

NewWaniDiary 20/01/2025

वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबीर येथील शिक्षण प्रसारक मंडळ शाळेच्या प्रांगणात ता. १९ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत आयोजित करण्यात आले होते. दरम्यान याशिबिरात विविध आजार असलेल्या असंख्य रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

आयोजित या शिबिराचे उद्घाटक म्हणून वणीचे आमदार संजय देरकर तर अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष विजय मुकेवार तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, दीपक कोकास, संतोष माहूरे, सावंगी मेघे येथील शशांक गोतरकर, डॉ. एन. पी. शिंगणे, सुनील कातकडे, गणपत लेडांगे सुधीर थेरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सावंगी मेघे जि. वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, वणी तालुका आरोग्य विभाग, व ग्रामीण रुग्णालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात हजारो रुग्णांनी सहभाग घेतला होता. यात विविध आजाराचे रुग्ण सहभागी झाले होते. जवळजवळपास अडीच ते तीन हजार रुग्णांनी सहभाग नोंदवला. यात विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्थानिक श्री संत जगन्नाथ महाराज नांदेश्वर देवस्थान येथे विविध दिवशी बोलाविण्यात आले आहे.

आजतागायत सर्वात मोठे मासे आरोग्य शिबीर विद्यमान आमदार संजय देरकर यांनी जनसामान्यांचा विचार करीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात विविध आजारावरील रुग्णांची तपासणी करून त्यांना विनोबा भावे रुग्णालय मेघे सावंगी येथे शस्त्रक्रिया होणार आहे. केवळ रुग्णांना औषध देण्यासाठी नव्हे तर?, त्यांच्या जिवासाठी आमदार संजय देरकर व संजय निखाडे यांनी जे कार्य केले ते जनसामान्याच्या आरोग्यासाठी! हे या महाशिबिरातून निदर्शनात येत होते. त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी वणी येथील एसपीएम शाळेतील प्रांगणात महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते. प्रसंगी या शिबिरात ग्रामीण रुग्णालय वणीचे अधीक्षक डॉ धर्मेंद्र सुलभेवार, डॉ विवेक गोफणे, वणी तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ समीर थेरे, मारेगावच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना देठे, झरि येथील तालुक वैधकिय अधिकारी डॉ मोहन गेडाम,
डॉ सुभाष इंगळे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मारेगाव तसेच डॉ. विलास बोबडे, बालू दुधकोहले, आशा सेविका, आरोग्य सेवक आदींनी परिश्रम घेतले.

Continue Reading

Previous: वणीच्या गोहत्या प्रकरणातील: महाराष्ट्र राज्याच्या गोहसेवा आयोग दाखल..
Next: कंपनीच्या कार्यालयासमोर 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.