
वणी :- दि. २६ जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण देशभरात आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन पूर्ण उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. वणी शहरातील अनेक कार्यालयांमध्ये, शाळांमध्ये तसेच शासकीय ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात आणि आनंदाने साजरा केले आहे.
वणी तहसील कार्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे.
शहरात या घटनेची चर्चा असून, वणी तहसील हे मुख्य विभाग असून शहरातील मोठे प्रशासन कार्यालय आहेत.
ब्रिटिशकालीन इमारतीत ध्वजारोहणासाठी योग्य व्यवस्था का करण्यात आली नाही, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
